शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Aamir Khan: रस्त्यावर फटाके फोडू नका म्हणणाऱ्या आमीर खानविरोधात 'फटाके'; भाजपा खासदाराने पत्रच लिहिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 15:20 IST

भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आमीरच्या या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.

ठळक मुद्देआपल्या कंपनीने आमीर खान यांना घेऊन एक जाहीरात केली आहे. त्यामध्ये, आमीर खान हे रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला देत आहेत. सामाजिक जाणीवेतून आणि सार्वजनिक मुद्द्यासंदर्भातील तुमचा हा प्रयत्न चांगला आहे.

मुंबई - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहे. आर्यनच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. मात्र, आमीर खानने अद्याप काहीही मत मांडलं नसल्याने आमीर खानच्या नावाची चर्चा रंगली होती. आता, वेगळ्याच कारणाने आमीरचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. आमीरने लोकांना रस्त्यावर फटाके न वाजविण्याचा सल्ला दिल्याने अनेकांना त्याला ट्रोल केलं आहे. टायर कंपनीच्या जाहिरातीमधून आमीर हा सल्ला देत आहे. 

भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आमीरच्या या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. कंपनीने नमाजच्या नावाखाली रस्ते बंद करणे आणि अजानच्या वेळी मस्जीदमधून बाहेर पडणारा आवाजाशी संबंधित समस्यांचंही समाधान करायला हवं, असे हेगडे यांनी म्हटलंय. कंपनीच्या सीईओंना पत्र लिहून हेगडे यांनी हिंदू बांधवांमध्ये रोष निर्माण करणाऱ्या जाहिरातींकडे आपण लक्ष द्यावं, असे पत्रातून सूचवले आहे. 

आपल्या कंपनीने आमीर खान यांना घेऊन एक जाहीरात केली आहे. त्यामध्ये, आमीर खान हे रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला देत आहेत. सामाजिक जाणीवेतून आणि सार्वजनिक मुद्द्यासंदर्भातील तुमचा हा प्रयत्न चांगला आहे. आपली जाहिरातीही कौतुकास्पद आहे, पण अशाच एका मुद्द्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. शुक्रवार आणि इतर महत्त्वाच्या सणाला मुस्लीमांकडून रस्ते जाम केले जातात. भारतामध्ये ही सर्वसामान्य बाब आहे, जेथे मुस्लिमांकडून रस्ता अडवला जातो, आणि नमाज अदा केली जाते, असे त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.  उत्तर कन्नडचे खासदार असलेल्या हेगडे यांनी सीएट कंपनीच्या सीईओ गोएंकांना लिहिलेल्या पत्रातून ध्वनीप्रदुषणाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. आपल्या जाहिरातीमध्ये ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा दिसून येतो, त्याबद्दल बोलताना लाऊडस्पीकरच्या अजानमधूनही मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होतो, याकडे हेगडे यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, सध्या ट्विटरवरही शेम ऑन सीएट असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. 

टॅग्स :Aamir Khanआमिर खानAdvertisingजाहिरातBJPभाजपाMember of parliamentखासदारTwitterट्विटर