नवी दिल्ली - आता विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट थेट शाळेतच केले जाणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. या उपक्रमामुळे देशभरातील तब्बल १७कोटी प्रलंबित आधार अपडेट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शाळांमध्ये कॅम्प पद्धतीनेच विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट वेगाने पूर्ण करता येईल.
शाळांना दिसणार कोणाचे अपडेट बाकीशाळांना थेट माहिती उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी यूआयडीएआयने शालेय शिक्षण विभागाला सोबत घेतले असून, यूडायस + अॅप्लिकेशनवर शाळांना नेमके कोणत्या विद्यार्थ्यांचे आधार अपडेट प्रलंबित आहे हे दिसणार आहे. त्यामुळे शाळांना सर्व विद्यार्थ्यांचे अपडेट एका ठिकाणी पूर्ण करण्यास सोपे जाईल, असे यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कशी होईल प्रक्रिया, फायदा काय होईल?१ -कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट करणे बाकी आहे, याची माहिती शाळांना बघता येईल.२- बायोमेट्रिक अपडेटसाठी शाळांमध्ये शिबिरे आयोजित केली जातील.३- ज्या विद्यार्थ्यांचे अपडेट बाकी आहे, त्यांना याचा लाभ एकाच ठिकाणी मिळेल.४-पालकांना आपल्या मुला-मुलीचे आधार बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी केंद्रांवर जावे लागणार नाही. त्यासाठी खर्ची होणारा पालकांचा वेळ, श्रम दोन्ही वाचतील.सर्व विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट्स होतील.
...तर होणार नाही परीक्षांची नोंदणीआधार अपडेट नसेल तर शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येतील. नीट, जेईई, सीयूईटीसारख्या प्रवेश व स्पर्धा परीक्षांची नोंदणी करण्यात अडचण येईल. त्यामुळे आधार आधारित प्रमाणीकरण अयशस्वी होऊ शकते, असा इशारा यूआयडीएआयने दिला आहे.
आवश्यक कागदपत्रे :विद्यार्थ्यांचे आधीचे आधार कार्ड / ई-आधार प्रिंट। शाळेचे ओळखपत्र / प्रवेश प्रमाणपत्र। आई किंवा वडिलांचे आधार कार्ड५ व १५ व्या वर्षी अपडेट बंधनकारकमुलांचा बायोमेट्रिक डेटा वयानुसार बदलतो. त्यामुळे ५ व्या वर्षी पहिला अपडेट आणि १५ व्या वर्षी दुसरा अपडेट बंधनकारक आहे, असे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.