लज्जास्पद! पतीला मारहाण करून केले बेशुद्ध; महिलेवर 6 जणांनी केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 13:49 IST2022-09-23T13:48:11+5:302022-09-23T13:49:38+5:30

ओडिशा राज्यातील बालेश्वर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

A woman has been gang-raped by 6 people in Baleshwar, Odisha state  | लज्जास्पद! पतीला मारहाण करून केले बेशुद्ध; महिलेवर 6 जणांनी केला सामूहिक बलात्कार

लज्जास्पद! पतीला मारहाण करून केले बेशुद्ध; महिलेवर 6 जणांनी केला सामूहिक बलात्कार

बालेश्वर : ओडिशा राज्यातील बालेश्वर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे दोन अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी मिळून महिलेसोबत अश्लील कृत्य केले. 18 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या इतर दोन अल्पवयीन मुलांचा अधिक तपास करत आहेत. द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेले आरोपी सोवरमपुर येथील रहिवासी आहेत. देवेंद्र सिंग उर्फ सोनू, कंका सिंग उर्फ बापुनू, बुला साहू उर्फ कार्तिक आणि सलख मुर्मू उर्फ रॉकेट अशी 4 आरोपींची नावे आहेत.

पतीला मारहाण करून केले बेशुद्ध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 28 वर्षांची आहे. महिला आणि तिचा पती काही कारणास्तव बालेश्वर रेल्वे स्टेशन येथे गेले होते. तिथून परतत असताना त्यांना आनंद बाजाराजवळ 4 युवकांनी घेरले आणि थांबवले. आरोपींनी पतीकडे पैशांची मागणी केली आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. पती दंपती मयूरभंज यांनी तिथून पळ काढला आणि जवळच्या इमारतीखाली जाऊन लपले. मात्र आरोपींना त्यांचा शोध लागला आणि त्यांनी मारहाण करून 10 हजारांची रक्कम काढून घेतली. त्यानंतर त्यांनी महिलेला जवळच्या शेतात नेले आणि तिथे सामूहिक बलात्कार केला. अशी माहिती बालेश्वर डीएसपी गायत्री प्रधान यांनी दिली. 

आरोपींनी पळ काढल्यानंतर महिला त्या जागेवर परतली जिथे तिचा पती बेशुद्ध अवस्थेत पडला होता. तिथे तिचा पती तिला शोधत असल्याचे तिला आढळून आले. अखेर सकाळी महिलेने सहदवेखुंटा पोलिस स्थानकात तिने तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा अधिक तपास करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत 4 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 

आरोपींकडून शस्त्रे साहित्य जप्त
आरोपींकडून पोलिसांनी स्कूटर, दोन धारदार शस्त्र, एक देशी पिस्तुल, तीन मोबाईल आणि 2,500 रूपयांची रक्कम जप्त केली आहे. आरोपी रॉकेटविरोधात सहदेवखुंटा पोलीस स्थानकात सध्याच्या घडीला पाच फौजदारी प्रकरणे सुरू आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

Web Title: A woman has been gang-raped by 6 people in Baleshwar, Odisha state