VIDEO : टोलच्या मागणीवरून दादागिरी! महिला कर्मचाऱ्याचे केस ओढले अन्...; घटना CCTVत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 20:03 IST2023-07-17T20:02:57+5:302023-07-17T20:03:25+5:30
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

VIDEO : टोलच्या मागणीवरून दादागिरी! महिला कर्मचाऱ्याचे केस ओढले अन्...; घटना CCTVत कैद
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने महिला टोल कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केली. टोलची मागणी केली असता आरोपी महिलेने टोल बूथमध्ये घुसून महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे समजते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आरोपीची ओळख पटली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. दादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुहारली टोल परिसरात ही घटना घडली.
महिला टोल कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा हा ४९ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, टोल प्लाझा येथे आरोपी महिला टोलच्या कॅबिनमध्ये घुसून दादागिरी करत आहे आणि महिला कर्मचाऱ्याला धमकावत तिचे केस ओढते. याशिवाय आरोपीने महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि नंतर तिला खुर्चीवरून खाली पाडले. ही घटना सोमवारी घडल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ग्रेटर नोएडा में टोल मांगने पर महिला की दबंगई, बूथ में घुसकर महिला कर्मचारी से की बदसलूकी pic.twitter.com/2wKAhRs3jH
— Abhishek Tiwari (@abhishe_tiwary) July 17, 2023
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
टोल कर्मचाऱ्यासोबत शिवीगाळ करत असलेल्या महिला आरोपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांनी आरोपी महिलेवर कडक कारवाईची मागणी केली आहे.