भारत सोडून तब्बल एवढ्या लोकांनी स्वीकारलं कॅनडाचं नागरिकत्व, समोर आली धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 11:08 AM2023-09-26T11:08:18+5:302023-09-26T11:09:05+5:30
Citizenship: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान, भारत सोडून कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरिकांची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या मुद्द्यावरून सध्या भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. यादरम्यान, भारत सोडून कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरिकांची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जानेरावारी २०१८ ते जून २०२३ या काळात तब्बल १.६ लाख भारतीयांनी भारतीय नागरिकत्व सोडून कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. हा आकडा भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या एकूण लोकांपैकी २० टक्के एवढा आहे. या आकडेवारीनुसार कॅनडा भारतीयांचा दुसरा सर्वात पसंतीचा देश आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेकिरा आहे. अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी सर्वाधिक संख्येमध्ये भारतीयांनी आपलं नागरिकत्व सोडलं. कॅनडानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आणि चौथ्या क्रमांकावर ब्रिटन आहे. त्यासाठी भारतीयांना आपलं नागरिकत्व सोडलं आहे. जानेवारी २०१८ ते जून २०२३ यादरम्यान सुमारे ८.४ लाख लोकांनी आपलं भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. तसेच ११४ वेगवेगळ्या देशांचं नागरिकत्व स्वीकारलं आहे.
भारताचं नागरिकत्व सोडणाऱ्या ५८ टक्के भारतीयांनी कॅनडा आणि अमेरिकेत जाण्यास प्राधान्य दिलं आहे. भारताचं नागरिकत्व सोडण्याचा हा ट्रेंड वर्षागणिक वाढत आहे. मात्र २०२० मध्ये कोरोनाच्या साथीमुळे भारतीय नागरिकत्व सोडण्याच्या दरात घट झाली होती. सन २०१८ मध्ये भारताचं नागरिकत्व सोडणाऱ्या नागरिकांची संख्या १.३ लाख होती. ती २०२२ मध्ये वाढून २.२ लाख झाली. जून २०२३ पर्यंत ८७ भारतीयांना भारतीय नागरिकत्व सोडलं आहे.