माणूसकीला काळीमा! कचराकुंडीत फेकलं लहान बाळ; भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 19:21 IST2024-02-18T19:20:29+5:302024-02-18T19:21:06+5:30
अर्भकाचे लचके भटके कुत्रे तोडत असल्याचं स्थानिकांनी पाहिलं. त्यांनी तातडीने या प्रकाराबाबत पोलिसांना कळवलं.

माणूसकीला काळीमा! कचराकुंडीत फेकलं लहान बाळ; भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके
उत्तर प्रदेशातील बांदा इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने नवजात बालकाला कचराकुंडीत टाकलं. त्यानंतर घडलेल्या घटनेनं सर्वांचंच काळीज पिळवटून गेलं. कारण भटक्या कुत्र्यांनी सदर बालकाचे लचके तोडले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत
याबाबतची अधिक माहिती अशी की, बबेरू कोतवाली येथील रस्त्याच्या जवळच असलेल्या एका कचराकुंडीतील अर्भकाचे लचके भटके कुत्रे तोडत असल्याचं स्थानिकांनी पाहिलं. त्यांनी तातडीने या प्रकाराबाबत पोलिसांना कळवलं. त्यानंतर तहसीलदार आणि पोसी अधिकाऱ्यांनी मृत बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
दरम्यान, या घटनेबाबत पोलीस अधिकारी तुषार श्रीवास्तव यांनी सांगितलं की, कचराकुंडीच्या शेजारी आम्हाला एक अर्भक आढळून आलं आहे. हे अर्भक तिथे कोणी ठेवलं, याबाबत तपास सुरू असून आम्ही लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करू, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.