शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

धक्कादायक! १ दिवसाच्या बाळाला १० फूट खोल विहिरीत फेकले; नवजात अर्भकाने मृत्यूवर मिळवला विजय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 3:46 PM

कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मंड्या : कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पांडवपुरा शहरातील या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान, इथे नुकत्याच जन्म झालेल्या नवजात अर्भकाला १० फूट खोल विहीरीत फेकून देण्यात आले. लक्षणीय बाब म्हणजे खोल विहीरीत फेकल्यानंतर देखील बालकाचा जीव वाचला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या बालकावर मंड्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससमध्ये उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नवजात अर्भकाने मृत्यूवर मिळवला विजय नवजात बालकाचा आरडाओरडा कानावर पडताच जवळच्या चंद्रा गावातील नागरिकांनी शुक्रवारी नवजात मुलाला विहिरीतून बाहेर काढले. स्थानिक केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर नवजात बाळाला तात्काळ एमआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले. सुदैवाने या बालकाला पाठीच्या दुखापतीव्यतिरिक्त कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नाही. बाळाला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

मंत्र्यांनी घेतली घटनेची दखल बाळाचा जन्म वेळेआधीच झाला असल्याने त्याचे वजन केवळ दीड किलो होते. मुलावर एनआयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मंत्री के. गोपालय्या यांनी शनिवारी एमआयएमएसला भेट देऊन नवजात अर्भकाच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि अधिकाऱ्यांना चांगली काळजी देण्याचे निर्देश दिले आहेत. अशा घटना होण्याचे प्रमाण परिसरात वाढत असल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत.

सोमवारी रायचूर जिल्ह्यातील मस्की तालुक्यातून देखील अशीच एक घटना समोर आली होती. जिथे सांतेकेलूर गावातील घनमाथा कोचिंग सेंटरमध्ये शिक्षकाने गरम पाणी टाकल्याने इयत्ता दुसरीतील आठ वर्षीय विद्यार्थ्याच्या पोटाला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली होती. पीडित अखिल व्यंकटेश याला २ सप्टेंबर रोजी लिंगसुगुर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र ही घटना उशिरा उघडकीस आल्यानंतर बालकल्याण समितीच्या संचालकांनी मस्की पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीministerमंत्रीhospitalहॉस्पिटल