दोन मुलांची आई पडली विवाहित तरुणाच्या प्रेमात, ग्रामस्थांनी रंगेहात पकडले, त्यानंतर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 16:11 IST2023-08-01T16:11:17+5:302023-08-01T16:11:40+5:30

Marriage: बिहारमधील छपरा येथे विवाहबाह्य संबंधांतून घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

A mother of two falls in love with a married youth, is caught red-handed by the villagers, then... | दोन मुलांची आई पडली विवाहित तरुणाच्या प्रेमात, ग्रामस्थांनी रंगेहात पकडले, त्यानंतर... 

दोन मुलांची आई पडली विवाहित तरुणाच्या प्रेमात, ग्रामस्थांनी रंगेहात पकडले, त्यानंतर... 

बिहारमधील छपरा येथे विवाहबाह्य संबंधांतून घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराचं ग्रामस्थांनी थेट लग्न लावून दिलं. कुठलाही गाजावाजा न करता, वऱ्हाडी, पावणे रावळे न जमवता ग्रामस्थांनी केवळ हर हर महादेवचा जयघोष करत ही महिला आणि तिच्या प्रियकराचं लग्न लावून दिलं.

ही घटना परसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलिगाव पंचायत स्थित लतरहिया गावात घडली आहे. ग्रामस्थानी सांगितलं की, या प्रियकर, प्रेयसीचं गावातीलच देवीस्थान मंदिरात लग्न लावून देण्यात आलं. मिळालेला माहितीनुसार या महिलेचा पती हा गावातच मोलमजुरी करतो. तो मढौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धेनुकी गावातील रहिवासी आहे.

पती घरात नसताना सोनम नावाच्या या महिलेची रहिमापूर गावातील उपेंद्र कुमार याच्याशी मैत्री झाली. दोन्ही गाव आजूबाजूलाच आहेत. दरम्यान, ही मैत्री हळुहळू प्रेमामध्ये परिवर्तित झाली. सोनम हिला पतीपासून दोन मुले आहेत. मात्र ती उपेंद्रच्या प्रेमामध्ये वेडी झाली. उपेंद्रचा विवाह झाला नव्हता. ग्रामस्थांनी सांगितलं की, सोनम ही तिच्या माहेरी आली होती. येथेच दोघेही प्रियकर-प्रेयसी परसा बाजारामध्ये भेटायचे.

त्यानंतर घरच्या मंडळींनी या तरुणाला पकडले. तसेच विवाहाबाबत विचारणा केली. त्यानंतर गावातील प्रमुख ग्रामस्थ आणि सरपंचांचा उपस्थितीत या दोघांचंही लग्न लावून देण्यात आलं. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे मात्र प्रियकर आणि प्रेयसी आनंदित झाले आहेत.  

Web Title: A mother of two falls in love with a married youth, is caught red-handed by the villagers, then...