इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:36 IST2025-10-10T13:29:57+5:302025-10-10T13:36:30+5:30
मध्य प्रदेशमध्ये एका छाप्यात माजी पीडब्लूडी इंजिनिअरच्या घरात मोठं घबाड सापडलं.

इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
मध्य प्रदेशमधील एका माजी पीडब्लूडी च्या इंजिनिअरच्या घरी आज पहाटे लोकायुक्तांनी छापेमारी केली. यामध्ये मोठे घबाड सापडले आहे, इंजिनिअरच्या घरात नोटांचा ढीग आणि सोने, चांदी मोठ्या प्रमाणात सापडले आहे. २६ लाख रुपये रोख रक्कम सापडली. तसेच मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. हा छापा भोपाळमध्ये टाकला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजेच PWD च्या माजी मुख्य अभियंत्याच्या घरावर हा छापा टाकला होता. यावेळी लोकायुक्तांनी मोठ्या प्रमाणात अनेक वस्तू देखील जप्त केल्या. इंजिनिअर मेहरा यांनी त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार करून या मालमत्ता मिळवल्याचा लोकायुक्तांनी आरोप केलाय.
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
चार आलिशान कार जप्त
हा छापा काल गुरुवारी टाकण्यात आला होता. लोकायुक्तांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील माजी पीडब्ल्यूडी मुख्य इंजिनिअरच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. मुख्य अभियंता गोविंद प्रसाद मेहरा यांच्याशी संबंधित चार ठिकाणी लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि लाखो रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी भोपाळच्या फ्लॅटमधून २६ लाख रुपये रोख, २.६४ किलो सोने, ५.५ किलो चांदी आणि एफडी कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय, मेहरा यांच्या नर्मदापुरम फार्महाऊसमधून १७ टन मध जप्त करण्यात आला आहे. येथे अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर, फिश फार्म, कॉटेजसह हायटेक उपकरणे देखील जप्त केली आहेत. मेहरा आणि त्यांच्या कुटुंबाच्या चार आलिशान कार देखील येथे जप्त करण्यात आल्या आहेत.
लोकायुक्तच्या छाप्यावेळी अधिकाऱ्यांना गोविंदपुरा येथे मेहराच्या मुलांची मालकीची पीव्हीसी पाईप फॅक्टरी देखील मिळाली. या कारखान्यात अधिकाऱ्यांना रोख रकमेसह असंख्य मालमत्तेची कागदपत्रे सापडली. या मालमत्ता मेहराने अभियंता असताना भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशातून बांधल्या होत्या, असा आरोप अधिकाऱ्यांनी केला.