शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मैथिली ठाकूर यांच्या आईच्या पर्सवर चोरांचा डल्ला, हिरेजडित दागिन्यांसह महागडं घड्याळ लांबवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 10:08 IST

Bihar Crime News: बिहारमधील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक बातम्या येत असतात. आता बिहारमधील या ढिसाळ कायदा आणि सुव्यवस्थेचा फटका प्रसिद्ध गायिका आणि भाजपाच्या आमदार मैथिली ठाकूर यांच्या कुटुंबीयांना बसला आहे.

बिहारमधील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक बातम्या येत असतात. आता बिहारमधील या ढिसाळ कायदा आणि सुव्यवस्थेचा फटका प्रसिद्ध गायिका आणि भाजपाच्याआमदार मैथिली ठाकूर यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. एका कार्यक्रमासाठी गेल्या असताना मैथिली ठाकूर यांच्या आई भारती ठाकूर यांच्याकडील मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. चोरीची ही घटना १ फेब्रुवारी रोजी घडली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अलिनगर विधानसभा मतदारसंघातील घनश्यामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालापट्टीगावात एका बैठकीला जाताना मैथिली ठाकूर यांच्या आई भारती ठाकूर यांनी त्यांची पर्स कारमध्ये ठेवली होती. मात्र जेव्हा त्या बैठकीहून परतल्या तेव्हा कारमधील पर्स गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या पर्समध्ये त्यांचे हिरेजडित दागिने आणि एक महागडं घड्याळ आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या. दरम्यान, गर्दीचा फायदा घेत चोर घटनास्थळावरून फरार झाले.

या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच घनश्यामपूर पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. तसेच तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्हीचं चित्रिकरण तपासण्याबरोबरच आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली जात आहे. चोरांनी घटनास्थळावरील गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारल्याचे सांगण्यात येत आहे. चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये महागडे दागिने आणि महागड्या घड्याळांचा समावेश आहे.

या घटनेमुळे बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दुरावस्थेचे पितळ उघडे पडले आहेत. तसेच एका आमदाराच्या कुटुंबीयांचं सामानही सुरक्षित राहत नसेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनि सांगितले आहे.    

English
हिंदी सारांश
Web Title : Theft at Maithili Thakur's Mother's Event; Jewelry, Watch Stolen

Web Summary : Thieves stole jewelry and a watch from singer Maithili Thakur's mother's purse during a Bihar event. Police are investigating the theft, highlighting Bihar's law and order concerns and public safety issues.
टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाMLAआमदारCrime Newsगुन्हेगारी