Video: फटाक्याच्या एका दुकानाने पेट घेताच मैदानावर आतषबाजी, भडकली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 10:06 AM2022-10-23T10:06:20+5:302022-10-23T10:15:36+5:30

स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलास संपर्क साधला आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

A fire broke out on the ground after a firecracker shop caught fire in andhra pradesh vijaywada | Video: फटाक्याच्या एका दुकानाने पेट घेताच मैदानावर आतषबाजी, भडकली आग

Video: फटाक्याच्या एका दुकानाने पेट घेताच मैदानावर आतषबाजी, भडकली आग

Next

विजयवाडा - आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे मैदानावर उभारण्यात आलेल्या फटाका स्टॉलला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. फटाक्याच्या एका दुकानाला आग लागल्यानंतर त्याच्या शेजारील इतरही दुकानांनी पेट घेतल्याचे पाहायला मिळाले. आगीची दुर्घटना घडल्याने सर्वत्र धांदल उडाली, स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलास संपर्क साधला आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, मैदानावरील इतर दुकाने तात्काळ बंद करुन आतषबाजी झालेल्या फटाक्यांपासून सावधगिरीने वाचविण्यात आली. 

दिवाळीनिमित्त फटाक्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उडाली आहे. त्यामुळेच, आपल्या घरातील चिमुकल्यांसाठी, लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या खरेदीसाठी फटाक्यांची दुकाने सजली आहे. विजयवाडा येथील गांधी मैदानावरही मोठ्या प्रमाणात ही दुकाने उभी टाकली आहे. या दुकानांना आज सकाळी आग लागल्याची दुर्घटना घडली. एका पाठोपाठ एक अशा अनेक दुकानांनी पेट घेतल्याचं दिसून आलं.  

Web Title: A fire broke out on the ground after a firecracker shop caught fire in andhra pradesh vijaywada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.