शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शिक्षकाच्या मारहाणीत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, परीक्षेत केली होती चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 14:52 IST

उत्तर प्रदेशमधील औरेया येथे शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील औरेया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीतील विद्यार्थी निखिल याने परीक्षेत केलेल्या चुकीमुळे शिक्षकाने त्याला मारहाण केली आणि त्यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. औरेया येथील अल्छदामधील आदर्श इंटर विद्यालयाचा विद्यार्थी निखिलने सामाजिक विज्ञानच्या परीक्षेत काही चुकीचे उत्तर लिहले होते. यावरून शिक्षक अश्वनी सिंग चांगल्याच भडकल्या आणि त्याला मारहाण केली. मारहाणीमुळे निखिलची तब्येत बिघडली आणि त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अछल्दा पोलीस स्थानक परिसरातील रहिवासी राजू दोहरे यांनी अछल्दा पोलीस स्थानकात 24 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. खरं तर शिक्षकाने 7 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याला मारहाण केल्यानंतर निखिलची तब्येत बिघडली होती.

विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू 24 तारखेला विद्यार्थ्याचे वडील राजू सिंग यांनी शिक्षकाविरोधात उपचारात सहकार्य न केल्याप्रकरणी आणि जातीय अपशब्दांवरून गुन्हा दाखल केला होता. यानंतर उपचारादरम्यान विद्यार्थी निखिलचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक चारू निगम यांनी म्हटले की, 24 सप्टेंबर रोजी अछल्दा पोलीस स्थानकात राजू सिंग यांच्याद्वारे लिखित स्वरूपाची सूचना देण्यात आली होती. यामध्ये 7 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीचा उल्लेख होता. शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळेच विद्यार्थ्याची तब्येत बिघडली आणि त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

24 सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून मृत्यूचे खरे कारण तपासण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच पॅनल आणि व्हिडीओ ग्राफ करण्यासाठी इटावा सीएमओशी चर्चा करण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू असून आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकStudentविद्यार्थीDeathमृत्यू