शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

47 वर्षीय 'भाजप' नेता 26 वर्षीय मुलीसह फरार; आरोपी दोन मुलांचा बाप, पक्षातून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 12:48 IST

तक्रारीच्या आधारे भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शहर सरचिटणीसवर समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी समाजवादी पार्टीच्या स्थानिक नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. भाजप नेत्याच्या या कृत्यामुळे पक्षाची बदनामी होत असतानाच भाजपने शहर सरचिटणीस यांची पक्षातून हकालपट्टी करून याप्रकरणी कठोर कारवाई  केली. त्याचवेळी समाजवादी पक्षाने सोशल मीडियावर या प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. 

खरं तर भाजप नेता 47 वर्षीय असून सपा नेत्याची मुलगी 26 वर्षांची आहे. याशिवाय भाजप नेता 2 मुलांचा बाप देखील आहे. सपा नेत्याची मुलगी आणि भाजप नेत्याचे प्रेमसंबंध मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. मुलीचे लग्न ठरल्यावर दोघेही पळून गेले. भाजप नेते आशिष शुक्ला विवाहित असून त्यांना 21 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांची मुलगी आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? समाजवादी पार्टीच्या नेत्याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, 47 वर्षीय भाजपचे शहर सरचिटणीस आशिष शुक्ला उर्फ ​​राजू शुक्ला हे त्यांच्या शेजारी राहतात. 13 जानेवारी रोजी आशिषने आपल्या 26 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. भाजप नेते आशिष हे दोन मुलांचे वडील आहेत. दुसरीकडे, सपा नेत्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी भाजप नेत्याविरुद्ध मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनी फरार भाजप नेते आशिष आणि सपा नेते यांच्या मुलीचा शोध सुरू केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीPoliceपोलिस