शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

सूरतच्या बिनविरोध सीटवर मोठा ट्विस्ट! काँग्रेस उमेदवार चार दिवस झाले तरी बेपत्ताच; निवडणूक आयोग गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 15:22 IST

BJP Won Surat Loksabha Seat, Suspicious: इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला तर अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचा उमेदवार जिंकला आहे. परंतु यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आपला आला आहे. प्रकरण वाढल्याचे दिसताच निवडणूक आयोग कार्यरत.

गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात बिनविरोध लढत झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला तर अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचा उमेदवार जिंकला आहे. परंतु यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आपला आला आहे. काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असून तो सापडत नसल्याने या बिनविरोध प्रकरणाविरोधात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कुंभाणी यांचा अर्ज रद्द झाल्याने काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सावरू शकलेले नाहीत. तर आपने कुंभाणी यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. आपने सुरतच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करत या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुरतचे जिल्हाधिकारी सौरभ पारघी यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाने वातावरण तापविताच मुख्य निवडणूक अधिकारी पी भारती यांनी याचा अहवाल मागविला आहे. यानुसार पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. निलेश कुंभाणी यांच्याविरोधात जिल्हाधिकारी अहवाल देणार आहेत. यानंतर सुमोटो लावायचा की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहून सु मोटो देखील घेतला जाऊ शकतो. अनेक प्रकरणांत आम्ही अशी कारवाई केली आहे, असे भारती यांनी म्हटले. 

या प्रकरणावर आता पोलीस अधिकारी शमशेर सिंग यांचे वक्तव्य आले आहे. ज्यांनी सुरक्षा मागितली त्यांना दिली. बसपाच्या उमेदवारानेही मागितली होती. परंतु ते घरी सापडले नाहीत. पोलिसांवर लावले जात असलेले आरोप चुकीचे आहेत. क्राइम ब्रांच कुठेही गेलेली नाही. आमच्याकडे तक्रार आल्यावर त्यावर कारवाई करणार, असे ते म्हणाले आहेत. 

कुंभाणी काही पहिल्यांदाच निवडणूक लढवत नव्हते. यापूर्वी त्यांनी चार वेळा निवडणूक लढविली आहे. यामध्ये महापालिका, विधानसभा अशा या निवडणुका आहेत. तिकीट मिळाल्यावर कुंभाणी यांनी सर्व ताकदीने प्रचार सुरु केला होता. कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जावर एका प्रस्तावका सही चुकीची असल्याची तक्रार भाजपाने केली होती. यावरून या प्रस्तावकांना बोलविण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु ते बेपत्ता होते. यानंतर कुंभाणी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. आता ते देखील बेपत्ता झाले असून त्यांच्या घरी कुलुप लावलेले आहे. तर गद्दार असे पोस्टर चिकटविण्यात आले आहे.  

टॅग्स :surat-pcसूरतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४gujarat lok sabha election 2024गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग