शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सरकारी गोदामांतून चोरीला गेले ९०३ मेट्रिक टन धान्य; पंजाबमध्ये सर्वाधिक धान्य चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 06:01 IST

महाराष्ट्रात धान्य चोरीची घटना नाही

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशभरातील सरकारी गोदामांतून ९०३.५ मेट्रिक टनापेक्षा अधिक गहू व तांदळाची चोरी झाली. मागील पाच वर्षांत झालेल्या चोरीतील अर्ध्यापेक्षा अधिक धान्य पंजाबमधील गोदामांतून चोरीला गेले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्याची नोंद नाही. खाद्य व सार्वजनिक वितरण विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार देशात चोरी झालेल्यामध्ये ४१४.५ मेट्रिक टन तांदूळ ४८९ मेट्रिक टन गहू समाविष्ट आहे. विशेष म्हणजे धान्याच्या उत्पादनात सर्वांत अग्रणी व संपन्न मानल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये सर्वाधिक ५५४ मेट्रिक टन धान्याची चोरी झाली. त्या पाठोपाठ तामिळनाडू १४४ मे. टन, कर्नाटक ६३ मे.टन व मध्यप्रदेशात ६० मेट्रिक टनचोरी झाली. तर कमी संपन्न मानल्या जाणाऱ्या छत्तीसगढ व पश्चिम बंगालसारख्या देशांत धान्याची सर्वांत कमी चोरी झाली.कोरोनाकाळात सर्वाधिक चोरी२०२०-२१ या कालावधीत सर्वाधिक ३५३ मेट्रिक टन गहू, तांदळाची चोरी नोंदली गेली. या कालावधीत देशभर लॉकडाऊन लावण्यात आलेला होता. याच कालावधीत सरकारने देशभरात ८० कोटींपेक्षा जास्त गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य दिले. कठोर उपाय केले तरीही... सरकारने कठोर उपाय केले तरी धान्याची चोरी झाली. एफसीआयच्या गोदामांत सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातात. याबरोबरच निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तारांचे कुंपण व रस्त्यांवर प्रकाशासाठी व्यवस्था केलेली असते. याशिवाय गोदामांना योग्य प्रकारे कुलूप लावले जाते. शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रशासनिक कारवाईही केली जाते. वेळोवेळी साठ्याची तपासणी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली केली जाते. तरीही चोरी झालेली आहे. या राज्यांत झाली सर्वाधिक धान्य चोरी (२०१६-२०२१)राज्य    चोरी (गहू, तांदूळ)पंजाब    ५५४.०१ तामिलनाडू    १४४ कर्नाटक    ६३.३९ मध्य प्रदेश    ६०.५४ हरियाणा    २६.५६ गुजरात    १५.०२ अखिल भारतीय    ९०३.५१