शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

९० गाड्यांचा वेग रेल्वेने वाढविला

By admin | Updated: October 25, 2015 04:07 IST

भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत ९० रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला आहे. त्यात तीन राजधानी आणि दोन शताब्दी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १० ते ११०

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत ९० रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला आहे. त्यात तीन राजधानी आणि दोन शताब्दी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १० ते ११० मिनिटांची बचत होणार आहे.भारतातील रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे असली तरीही तिचा वेग फारच कमी आहे. जगभरातील रेल्वेगाड्यांनी गेल्या काही दशकांत आपल्या रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला असला तरीही भारतात मात्र तसा वाढविण्यात आला नाही. भारतीय रेल्वे अजूनही ताशी ५० ते ५२ कि. मी. वेगाने धावते.या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत प्रथमच ९० गाड्यांचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८९ एक्स्प्रेस आणि सवारी गाड्यांचा वेग प्रतितास पाच कि. मी.ने वाढवून ६० कि.मी. प्रतितास केला जाणार आहे. प्रवासास लागणारा कालावधी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात येत आहेत. वेग वाढविण्यात येणारे अडथळे, तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उदाहरणार्थ भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेग ताशी १५० कि. मी. आहे. तो आणखी सात कि. मी.ने वाढविण्यात आला आहे.गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकानुसार ८९ गाड्यांचा वेग वाढविण्यात आल्याने १० ते ११० मिनिटांची बचत झाली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास पाहता हे खूप मोठे यश आहे. मार्ग कमी व गाड्या जास्त यामुळे खरे तर गाड्यांचा वेग कमी झाला होता. हावड्याहून निघणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेगही केवळ १० कि. मी. प्रतितासाने वाढविला आहे. नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. ते पाहता नवी दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात आल्याने २५ मिनिटांची, तर नांदेड-पुणे एक्स्प्रेसचा वेग वाढविल्याने तब्बल ११० मिनिटांची बचत झाली आहे. मुंबई-अहमदाबाद गाडीचा वेग वाढल्याने २५ मिनिटे कमी लागतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)