नकली नंबर प्लेट, सरकारी स्टिकरचा वापर; RBI अधिकारी असल्याचे सांगून एटीएम व्हॅन लुटली, ७ कोटी ११ लाख लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:46 IST2025-11-20T12:39:25+5:302025-11-20T12:46:15+5:30

बंगळुरुमध्ये सरकारी अधिकाऱ्या असल्याचे सांगून चोरट्यांनी चक्क एटीएम व्हॅन लुटल्याची घटना समोर आली आहे.

7 crore rupees looted in broad daylight in Bengaluru ATM cash van stopped by impersonating RBI officer | नकली नंबर प्लेट, सरकारी स्टिकरचा वापर; RBI अधिकारी असल्याचे सांगून एटीएम व्हॅन लुटली, ७ कोटी ११ लाख लंपास

नकली नंबर प्लेट, सरकारी स्टिकरचा वापर; RBI अधिकारी असल्याचे सांगून एटीएम व्हॅन लुटली, ७ कोटी ११ लाख लंपास

Karnatak Crime:कर्नाटकची राजधानी बंगळूरुमध्ये दिवसाढवळ्या दरोड्याची घटना समोर आली आहे. एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी पैसे घेऊन जाणाऱ्या एका कॅश व्हॅनला अडवून, ७ कोटी ११ लाख रुपये लुटून चोरटे इनोव्हा कारमधून फरार झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे चोरट्यांनी सरकारी स्टिकर लावलेल्या कारचा वापर केला आणि स्वतःला 'आरबीआयचे अधिकारी' असल्याचे भासवून ही लूट केली.

बुधवारी दुपारी साउथ एंड सर्कलजवळ ही घटना घडली. सीएमएस कंपनीची ही कॅश व्हॅन जेपी नगर येथील बँक शाखेतून पैसे घेऊन एटीएममध्ये भरण्यासाठी जात असताना, इनोव्हा कारमधून आलेल्या सात ते आठ चोरट्यांनी त्यांना अडवले. इनोव्हा कारमधून उतरलेल्या दरोडेखोरांनी स्वतःला 'आरबीआयचे अधिकारी' असल्याचे सांगून  धमकावले आणि कागदपत्रे तपासण्याचा बहाणा केला. त्यानंतर चोरट्यांनी कॅश व्हॅनमध्ये असलेल्या बंदूकधारी सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी गाडीचा चालक आणि रोख रक्कम लोड करणारा स्टाफ यांना धमकावून आपल्या इनोव्हा कारमध्ये बसवले.

टोळीने चालकाला डेअरी सर्कलच्या दिशेने जाण्यास सांगितले. डेअरी सर्कल उड्डाणपुलावर त्यांनी कॅश व्हॅन थांबवली. तिथे दरोडेखोरांनी कॅश व्हॅनमधून ७.११ कोटी रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने आपल्या इनोव्हा कारमध्ये भरली आणि घटनास्थळावरून धूम ठोकली.

नकली नंबर प्लेट आणि हायटेक लूट

या दरोडेखोरांनी लुट करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम केले होते. त्यांनी आपल्या इनोव्हा कारसाठी नकली नंबर प्लेटचा वापर केला होता. तसेच, सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी आयकर अधिकारी म्हणून ओळख सांगितले. मात्र नंतर त्यांनी आरबीआयचे अधिकारी असल्याचे सांगितले. कर्नाटकचे गृहमंत्री एच. परमेश्वर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. "बंगळूरुमध्ये अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांनी तातडीने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

पोलिसांकडून तपास युद्धपातळीवर

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण शहरात वाहनांची तपासणी सुरू केली आहे. शहर पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी सांगितले की, या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दोन डीसीपी आणि एका संयुक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. दरोडेखोरांचा मार्ग आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे कर्नाटकची राजधानी बेंगळूरुमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Web Title : RBI अधिकारी बनकर एटीएम वैन से 7.11 करोड़ की लूट

Web Summary : बेंगलुरु में आरबीआई अधिकारी बनकर एटीएम वैन से 7.11 करोड़ रुपये लूटे गए। नकली नंबर प्लेट और सरकारी स्टिकर का इस्तेमाल हुआ। पुलिस जांच कर रही है।

Web Title : RBI Officer Impersonation: 7.11 Crore Rupees Looted from ATM Van

Web Summary : Bengaluru: Impersonating RBI officials, robbers looted ₹7.11 crore from an ATM cash van using a fake number plate and government-stickered car. Police are investigating the bold daylight robbery.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.