शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

67 लाख भारतीयांवर युद्धामुळे संकट; निर्यातीचा खर्च परवडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 08:17 IST

हस्तशिल्पकारांची सरकारकडे मदतीची याचना; निर्यातीचा खर्च परवडेना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इस्रायला समुद्रात रोखण्यासाठी हुथी बंडखोरांनी जगातील सर्वांत व्यस्त मार्ग असलेल्या लाल समुद्रावर अक्षरशः ताबा मिळवला आहे. त्यांच्या हल्ल्यांमुळे मालाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा परिणाम भारताच्या निर्यातदारांवरही झाला आहे. आता त्यांना अमेरिका किंवा युरोपीय देशांमध्ये माल पाठवण्यासाठी लांबचा रस्ता निवडावा लागत आहे. त्यामुळे मालवाहतूक खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे हस्तशिल्प निर्यात प्रोत्साहन परिषदेने (ईपीसीएच) सरकारकडे मालवाहतुकीवर अनुदानाची मागणी केली आहे.

नेमके काय संकट?

१५००-२००० डॉलर्स खर्च लाल समुद्राच्या संकटापूर्वी येथून अमेरिकेत माल पाठवण्यासाठी येत होता.

६,००० डॉलर्सपर्यंत खर्च सध्या अमेरिकेत माल पाठवण्यासाठी येत आहे. त्यामुळे मालवाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

सरकारने काय करावे?nईपीसीएचचे अध्यक्ष दिलीप बैद यांनी सांगितले की, देशभरात ६७ लाख हस्तकलाकार आहेत, ज्यांचा माल ईपीसीएच जगभरातील बाजारपेठेत नेते. nनिर्यातदारांना सबसिडी द्यावी. असे झाल्यास, त्यांचा माल जगभरातील बाजारपेठेत पाठवणे सोपे होईल. जगभरातील बाजारपेठांमध्ये सुस्ती असल्याने भाव मिळत नसल्याने मंदीचीही स्थिती आहे.

...तर कारागीर जगणार कसे? हस्तकला वस्तूंचे मूल्य कमी आणि आकार अधिक असतो. जर आपण रत्ने आणि दागिने क्षेत्राकडे पाहिले तर १० हजार डॉलर्स किमतीच्या वस्तू एका छोट्या बॉक्समध्ये येतात; पण हस्तकलेच्या वस्तू खूप मोठ्या आहेत. कंटेनरमध्ये १५,००० डॉलर्सचा माल बसतो. हा माल बाजारात पाठवण्यासाठी ६,००० डॉलर्स खर्च झाले, तर कारागीर जगणार कसे? असे बैद यांनी म्हटले.

टॅग्स :Indiaभारतwarयुद्धartकला