शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा ‘नशा’ उतरवला बोटीसह ६०० कोटींचे हेरॉइन जप्त

By admin | Updated: April 22, 2015 04:52 IST

गुजरातच्या किनारपट्टीवरील आंतरराष्ट्रीय जलसीमेलगत भारतीय नौदल व तटरक्षक दलाने केलेल्या संयुक्त कारवाईमुळे कोट्यवधींची ‘नशा’ भारतात पाठविण्याचा पाकिस्तानी तस्करांचा कट सोमवारी उधळला गेला.

अहमदाबाद - गुजरातच्या किनारपट्टीवरील आंतरराष्ट्रीय जलसीमेलगत भारतीय नौदल व तटरक्षक दलाने केलेल्या संयुक्त कारवाईमुळे कोट्यवधींची ‘नशा’ भारतात पाठविण्याचा पाकिस्तानी तस्करांचा कट सोमवारी उधळला गेला. सीमावर्ती पंजाबला अमली पदार्थांच्या आहारी नेण्यासाठी नेटाने प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानमधून ६०० कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह समुद्रामार्गे भारतात शिरलेली संशयित बोट या कारवाईत जप्त करण्यात आली़ शिवाय या बोटीवरील ८ पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. या आठही जणांची चौकशी नौदल, तटरक्षक दल आणि गुप्तचर संस्था संयुक्तरीत्या करणार असून त्यातून अशा आणखी काही कटांचा सुगावा लागण्याची शक्यता आहे. गेल्या ३१ डिसेंबरच्या उत्तररात्री स्फोटकांचा मोठा साठा घेऊन भारतात शिरू पाहणाऱ्या पाकिस्तानी नौकेचा तटरक्षकांनी यशस्वी पाठलाग केल्यानंतर त्यावरील संशयित दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणला होता. परंतु यावेळी संशयित नौकेवरील सर्वच्या सर्व पाकिस्तानी हाती लागले आहेत. गुप्तचरांनी दिलेल्या खात्रीलायक इशाऱ्याच्या आधारे नौदलाच्या व तटरक्षक दलाच्या विविध तुकड्या या कारवाईसाठी तैनात करण्यात आल्या होत्या. नौदलाच्या निर्घाट व कोंडुल, तसेच तटरक्षक दलाच्या संग्राम बोटीने कारवाईत भाग घेतला. पाकिस्तानातून गुजरातच्या सागरी हद्दीत शिरलेल्या संशयित नौकेचा माग घेण्यासाठी डॉर्नियर विमानांनी टेहळणी केली होती. मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ घेऊन आलेली एक बोट गुजरात किनाऱ्याजवळ सोमवारी पकडण्यात आली. आठ पाकिस्तानी नागरिक ही बोट चालवत असल्याचे आढळले, असे संरक्षण मंत्रालयातर्फे मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या संशयित नौकेवरून अमली हेरॉईनचा जो साठा जप्त करण्यात आला, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ६०० कोटी रुपये असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. अमली पदार्थांचा हा साठा एका बोटीवरून अन्य बोटींवर पाठविणे सोपे जावे, यासाठी हे अमली पदार्थ दुसऱ्या बोटीपर्यंत पोहोचविण्यासाठी सॅटेलाईट फोन व जीपीएस तंत्राचा वापर करण्यात येत होता. ही यंत्रणाही जप्त करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)