६ वर्षीय चिमुकल्याची हत्या की मृत्यू ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 18:51 IST2018-07-09T18:08:51+5:302018-07-09T18:51:31+5:30
पाटणातील फतुहा येथे असलेल्या सेफाली इंटरनॅशनल शाळेत घडला धक्कादायक प्रकार

६ वर्षीय चिमुकल्याची हत्या की मृत्यू ?
बिहार - पाटणातील एका इंटरनॅशनल शाळेत ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिमुकल्याच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे. या मृत्यूचे गूढ कायम असून मयत मुलाच्या पालकांनी हि हत्या असल्याचा आरोप केला आहे. पालकांनी अभिमन्यूचा खून केल्याचा दावा केला आहे.
पाटणातील फतुहा येथे असलेल्या सेफाली इंटरनॅशनल शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मयत चिमुकल्याचा नाव अभिमन्यू कुमार असे असून तो ज्युनिअर केजीत संगिकत होता. याप्रकरणी पोलिसांनी शाळेतील एक शिक्षक आणि वॉर्डनला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले.मात्र, हा मृत्यू आहे कि हत्या याचा पोलीस तपास करीत असून मयत चिमुकल्याच्या पालकांनी अभिमन्यूच्या शरीरावर जखमा आढळल्या असल्याचे सांगितले. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त करत नागरिक रस्त्यावर उतरले होते. रस्त्या बंद करत टायर जाळण्यात आले. तसेच जो कोणी या घटनेस जबाबदार आहे त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.