लॉकडाऊनमध्ये ६० लाख कर्मचारी झाले बेरोजगार, सीएमआयईचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 12:36 AM2020-09-19T00:36:12+5:302020-09-19T06:52:29+5:30

‘सीएमआयई’ने केलेल्या ‘कंझ्युमर पिरॅमिड हाउस होल्ड सर्व्हे’मध्ये म्हटले आहे की, २०१६ पासून पांढरपेशा रोजगारांत वाढ होत होती.

6 million employees lost in lockdown, CMIE report | लॉकडाऊनमध्ये ६० लाख कर्मचारी झाले बेरोजगार, सीएमआयईचा अहवाल

लॉकडाऊनमध्ये ६० लाख कर्मचारी झाले बेरोजगार, सीएमआयईचा अहवाल

Next

नवी दिल्ली : कोविड-१९ला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मे आणि आॅगस्ट यादरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ६० लाख पांढरपेशे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. इंजिनिअर, फिजिशियन, अकाउंटंट, विश्लेषक आणि शिक्षक यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
‘सीएमआयई’ने म्हटले की, सरकारने जूनमध्येच अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू केली असली तरी, सातत्याचे निर्बंध आणि स्थानिक पातळीवरील लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत अडथळे येत आहेत. रोजगाराच्या मार्गातही असेच अडथळे निर्माण झाले
आहेत.
‘सीएमआयई’ने केलेल्या ‘कंझ्युमर पिरॅमिड हाउस होल्ड सर्व्हे’मध्ये म्हटले आहे की, २०१६ पासून पांढरपेशा रोजगारांत वाढ होत होती.
जानेवारी ते एप्रिल २०१६ या काळातील लाटेत १२.५ दशलक्ष पांढरपेशे कर्मचारी भरले गेले होते. मे-आॅगस्ट २०१९ या काळात त्यांची संख्या सर्वोच्च पातळीवर १८.८ दशलक्ष होती. सप्टेंबर-डिसेंबर २०१९ या काळात १९.७ दशलक्षासह ती स्थिर होती. जानेवारी-एप्रिल २०२० या काळात ती घटून १८.१ दशलक्षावर आली. या काळात लॉकडाऊनचा अंशत: परिणाम दिसून आला.
मे-आॅगस्ट २०२० या काळात मात्र पांढरपेशा कर्मचाऱ्यांची
संख्या घटून १२.२ दशलक्षांवर आली. २०१६ नंतरचा हा नीचांकी
आकडा आहे. मागील चार वर्षांत पांढरपेशा रोजगार क्षेत्रात जी वाढ झाली होती, ती मे-आॅगस्ट
२०२० या काळात लॉकडाऊनमुळे वाहून गेली.
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी ‘सीएमआयई’च्या वेबसाइटवर लिहिले की, मे-आॅगस्ट २०२० या काळात ५.९ दशलक्ष पांढरपेशा कर्मचाऱ्यांना आपले रोजगार गमवावे लागले. मे-आॅगस्ट २०१९च्या आकड्यांशी तुलना केल्यास बेरोजगारीचा हा आकडा ६.६ दशलक्षांवर जातो.

पांढरपेशांचा रोजगार नीचांकी
मे-आॅगस्ट २०२० या काळात मात्र पांढरपेशा कर्मचाºयांची संख्या घटून १२.२ दशलक्षांवर आली. २०१६ नंतरचा हा नीचांकी आकडा आहे. मागील चार वर्षांत पांढरपेशा रोजगार क्षेत्रात जी वाढ झाली होती, ती मे-आॅगस्ट २०२० या काळात लॉकडाऊनमुळे वाहून गेली.

Web Title: 6 million employees lost in lockdown, CMIE report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.