शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

उमा नगरीत ५९ हजारांची घरफोडी

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

सोलापूर : मुरारजी पेठेतील उमा नगरीत राहणार्‍या सुमन सिद्राम आवताडे (वय ५०) यांचे घर फोडून चोरट्याने रोकड, दागिने असा ५८ हजार २०० रुपयांचा ऐवज पळवला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही चोरी झाली.

सोलापूर : मुरारजी पेठेतील उमा नगरीत राहणार्‍या सुमन सिद्राम आवताडे (वय ५०) यांचे घर फोडून चोरट्याने रोकड, दागिने असा ५८ हजार २०० रुपयांचा ऐवज पळवला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही चोरी झाली.
सुमन आवताडे या घर बंद करून स्वामी समर्थांच्या पूजेसाठी मुलीच्या घरी गेल्या. ही संधी साधून चोरट्याने आतील लोखंडी कपाटातील ७०० रुपये आणि दागिने पळवले. शुक्रवारी सकाळी घरी आल्यानंतर सुमन आवताडे यांना घर फोडल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार खटाणे करीत आहेत.
चोरीचा प्रयत्न
मोदी येथील मोंढे ऑटोमोबाईल्स शोरुमच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. २८ जानेवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी पवन मोंढे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, तपास सपोनि बोधे करीत आहेत.
पती-पत्नी, नोकरास मारहाण
जागेचा ताबा घेण्यावरून गीता कुमार वेर्णेकर, तिचा पती आणि नोकरास मारहाण केल्याप्रकरणी राजकुमार हंचाटे, दत्तात्रय रचनभेरी, पीरसाब शेख, बागवान, बॉबी आणि इतर एक अशा सहा जणांवर विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद नगरात हा प्रकार घडला. याप्रकरणी गीता वेर्णेकर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, तपास सपोनि उशिरे करीत आहेत.
औद्योगिक वसाहतीत चोरी
औद्योगिक वसाहतीतील अनिल कलगोंडा पाटील यांच्या कारखान्यातून गुरुवारी रात्री साडेसात वाजता ११ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरट्याने पळवले. याप्रकरणी अनिल पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार काशिद करीत आहेत.
घरगुती गॅसचा बेकायदा वापर
घरगुती गॅस रिक्षामध्ये भरत असताना सलीम रहिम शेख (रा. गवळी वस्ती, सोलापूर) यास पुरवठा निरीक्षक संध्या बाळासाहेब सोनवणे यांनी गुरुवारी दुपारी १ वाजता रंगेहाथ पकडले. त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सलीम शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास महिला सपोनि शेख करीत आहेत.