प्राप्तिकरच्या रडारवर तब्बल ५.५ लाख लोक
By Admin | Updated: July 15, 2017 00:20 IST2017-07-15T00:19:46+5:302017-07-15T00:20:08+5:30
नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये भरघोस पैसा जमा करूनही त्याचा खुलासा न देऊ शकलेल्या साडेपाच लाख लोक आता गोत्यात येऊ शकतात.

प्राप्तिकरच्या रडारवर तब्बल ५.५ लाख लोक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये भरघोस पैसा जमा करूनही त्याचा खुलासा न देऊ शकलेल्या साडेपाच लाख लोक आता गोत्यात येऊ शकतात. त्याच्यावर प्राप्तीकर खात्याची नजर असून, त्यांना येत्या काळात नोटीस येऊ शकते.
सरकारने ‘आॅपरेशन क्लीन मनी’ मोहीम सुरू केली होती. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात आता अनेकांचा झटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे संदिग्ध व्यवहारांची माहिती आली आहे. ज्यांचे व्यवहार आणि त्यांचे उत्पन्न यांचा मेळ लागत नाही अशा साडेपाच लोकांनाई-मेल आणि एसएमएस पाठवण्यात येत आहेत. अनेक कंपन्यांचे संदिग्ध व्यवहार आणि बेनामी संपत्तीचा शोध घेण्यासाठी सीबीडीटीने डेटा अॅनालिटिक्सची मदत घेण्यास सुरूवात केली आहे. मंडळाने अशाही एक लाख लोकांचा शोध घेतलाय की ज्यांनी आॅपरेशन क्लीन मनी मोहिमेअंतगर्त पहिल्या टप्प्यात आपल्या खात्यांच्या व्यवहारांचा खुलासा केलेला नाही.