शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

काश्मीर खोऱ्यात आणखी २८ हजार सशस्त्र पोलीस रवाना; जनतेत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 6:28 AM

काश्मीरच्या त्रिभाजनाच्या अफवा : विशेष दर्जा काढण्यात येण्याचीही चर्चा

यात्रेकरू व पर्यटकांना खोरे सोडण्याच्या सूचना

नवी दिल्ली/श्रीनगर : पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे कारण सांगून केंद्र सरकारने काश्मीर खोºयात शुक्रवारी आणखी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २८0 कंपन्या (२८ हजार सशस्त्र पोलीस) पाठवल्याने श्रीनगर व संपूर्ण खोºयाला लष्करी तळाचे स्वरूप आले आहे. केंद्राने २५ जुलै रोजी १0 हजार सशस्त्र सैनिक पाठवले होते. याखेरीज काश्मीर खोºयात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ६५ हजार जवान तैनात असून, अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने आणखी २0 बटालियन पाठवण्यात आल्या होत्या. सशस्त्र दलाचे सुमारे एक लाख पोलीस काश्मीर खोºयात आता असून, त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरमधील कायदा व सुव्यवस्था यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इतके सशस्त्र पोलीस रवाना करण्यात आले आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. पण अचानक इतक्या सशस्त्र पोलिसांना तिथे पाठवण्याची गरज आता का भासावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमरनाथ यात्रेकरू तसेच खोºयात फिरायला आलेले पर्यटक यांनी ताबडतोब तेथून निघावे, अशा सूचनाही केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व यात्रेकरूही घाबरून गेले असून, तेथून मिळेल त्या मार्गाने जम्मूकडे येण्यासाठी त्यांची घाई सुरू झाली आहे. दहशतवादी हल्ल्याचे कारण सांगून त्यांना तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्याने आपल्यावर लगेच हल्ले सुरू होतील की काय, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यातच अमरनाथच्या मार्गावर पाकिस्तानी बनावटीचे भूसुरुंग व शस्त्रे मोठ्या प्रमाणात आढळल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तिथे प्रचंड घबराट आहे. सरकारने काश्मीर खोºयात इतकी घबराट का निर्माण केली आहे, इतके सशस्त्र सैनिक खोºयात अचानक का पाठवण्यात आले आहेत, याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारनेही दिलेले नाही. त्यामुळे तिथे अनेक अफवा पसरल्या आहेत. जम्मू-काश्मीर राज्याचे त्रिभाजन करण्याचा सरकारचा विचार असल्याची अफवाही त्यात आहे. काश्मीर खोरे, जम्मू व लडाख असे त्रिभाजन करण्याची केंद्र सरकार तयारी करीत आहे, असे अनेकांना वाटत आहे.

 काश्मीरमध्ये इतके सशस्त्र पोलीस का पाठवण्यात येत आहेत आणि यात्रेकरू व पर्यटकांना काश्मीर खोरे सोडण्याच्या सूचना का देण्यात आल्या आहेत, असा सवाल विरोधी सदस्यांनी केला. पण त्यावेळी अन्य चर्चा सुरू असल्याने या विषयावर सरकारतर्फे काहीच उत्तर देण्यात आले नाही. अध्यक्षपदी बसलेल्या मीनाक्षी लेखी यांनी मूळ विषयावरील चर्चाच सुरू ठेवली. काहींच्या मते विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी इतके सशस्त्र पोलीस पाठवण्यात आले आहेत, तर पंतप्रधान मोदी १५ आॅगस्ट रोजी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावणार असल्याने इतकी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.दडपण आणण्याचा केंद्राचा डाव : मेहबूबाकाश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हे सारे त्रिभाजनासाठी तसेच ३५ (अ) व ३७१ कलम रद्द करण्यासाठी सुरू आहे का, असा सवालच केला आहे. त्यांचे वडील व नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनीही सशस्त्र दलाच्या इतक्या तुकड्या आता पाठवण्याचे कारण काय, असे विचारले आहे. खोºयात राहणाºया जनतेमध्ये घबराट पसरवण्याचा हा केंद्राचा डाव आहे. पण काश्मिरी जनतेवर लष्करी मार्गाने दबाव वा दडपण आणण्याचे केंद्राचे प्रपत्न यशस्वी होणार नाही, असे पीडीपीच्या प्रमुख व माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. लोकसभेतही विरोधी सदस्यांनी हा विषय उपस्थित केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBorderसीमारेषाAmit Shahअमित शहाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती