भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजार आणि कुपोषणमुक्त होऊ शकतो: नारायण मुर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 16:17 IST2021-07-17T16:17:09+5:302021-07-17T16:17:38+5:30
भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजारपण आणि कुपोषणातून मुक्त होऊ शकतो अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनी केलं आहे.

भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजार आणि कुपोषणमुक्त होऊ शकतो: नारायण मुर्ती
भारत पुढील ५० वर्षांत गरिबी, आजारपण आणि कुपोषणातून मुक्त होऊ शकतो अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मुर्ती यांनी केलं आहे. हे सोपं काम नसलं तरी प्रत्येकानं याची जबाबदारी स्वीकारुन आव्हानांना सामोरं जावं यातूनच यशस्वी होण्याच्या संधी उपलब्ध होतील, असं नारायण मुर्ती म्हणाले. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ गुवाहटीच्या २३ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. (In 50 years India can be free of poverty and sickness Narayana Murthy)
"गेल्या ७०-७५ वर्षांच्या काळात देशानं आजवर अनेक महत्वाकांक्षी स्वप्नं पूर्ण करुन दाखवली आहेत. यापुढील काळात येत्या ५० वर्षांत भारत देश विकसीत देश म्हणून ओळखला जावा आणि देशातून गरिबी, आजारपण आणि कुपोषण हद्दपार व्हावं अशी आशा आहे", असं नारायण मुर्ती म्हणाले.
विकासाची महत्वाकांक्षी, शिस्त, चांगली मूल्य, कठोर परिश्रम आणि त्यागातून देश आर्थिक शक्ती बनला तरच हे धेय्य साध्य होऊ शकतं, असंही ते म्हणाले. "भारत जेव्हा विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी चांगलं व्यासपीठ, मुक्त विचारधारा, सहिष्णुता, गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा यात जगाचा मार्गदर्शक होईल तेव्हाच हे शक्य आहे", असंही नारायण मुर्ती म्हणाले.