तिहार जेलमधील ५० कर्मचारी निलंबित...! कोरोना काळात बायोमेट्रिक पद्धतीने झाली होती भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 06:43 PM2023-12-02T18:43:46+5:302023-12-02T18:44:02+5:30

तिहार कारागृहात बायोमेट्रिक पद्धतीने भरती झालेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 50 employees of Delhi's Tihar Jail, who were recruited through biometrics, have been suspended  | तिहार जेलमधील ५० कर्मचारी निलंबित...! कोरोना काळात बायोमेट्रिक पद्धतीने झाली होती भरती

तिहार जेलमधील ५० कर्मचारी निलंबित...! कोरोना काळात बायोमेट्रिक पद्धतीने झाली होती भरती

नवी दिल्ली: दिल्लीच्या तिहार कारागृहात बायोमेट्रिक पद्धतीने भरती झालेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तिहार कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये अर्थात कोरोना काळात दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डामार्फत (DSSB) तिहारमध्ये विविध पदांवर भरती करण्यात आली होती. बायोमेट्रिक पद्धतीने ही भरती करण्यात आली होती. मात्र, अवैध पद्धतीने ही भरती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.

दरम्यान, भरती झाल्यानंतर अधीनस्थ सेवा निवड मंडळाने पडताळणी केली असता सर्वप्रकार उघडकीस आला. ५० कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक्स आणि फोटो जुळले नाहीत. मग सेवा समाप्तीची सूचना म्हणून ३० नोव्हेंबर रोजी या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याची नोटीस दिल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे.

५० कर्मचारी निलंबित
तिहार तुरुंगातून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ३९ वॉर्डन, ९ सहाय्यक अधीक्षक आणि २ मॅट्रॉनचा समावेश आहे. DSSSB चा अंतिम अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर आता तिहार तुरुंगात विविध पदांवर अवैध पद्धतीने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Web Title:  50 employees of Delhi's Tihar Jail, who were recruited through biometrics, have been suspended 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.