शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद; 10 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 5:40 PM

Chhattisgarh Naxal Encounter : नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. तर दहा जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

छत्तीसगडमधील बिजापूर येथील तररेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. तर दहा जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहीद जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 75 किमी अंतरावर असलेल्या सिलगेर गावाजवळील जोन्नगुडा जंगलात ही चकमक झाली. यामध्ये नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच घटनास्थळावर नक्षलवाद्यांचे काही मृतदेह देखील आढळून आले आहेत. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. तर दहा जवान जखमी झाले असून जखमी जवानांना एअरफोर्सच्या हेलिकॉप्टर आणि रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

खोब्रामेंढा जंगलातील चकमकीत पाच नक्षलवादी ठार

कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात चकमक उडत आहे. पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकात आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी नक्षलवाद्यांचा कॅम्प उध्वस्त करत पोलिसांनी घातपाताचा कट उधळून लावला होता. यानंतर त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले. 

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीIndian Armyभारतीय जवानIndiaभारतChhattisgarhछत्तीसगड