भीषण अपघातात ५ ठार ८ जखमी; द्वारसुनी घाटात ट्रक पलटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:52 IST2024-01-24T12:50:30+5:302024-01-24T12:52:12+5:30

मयूरभंज - ओडिशातील द्वारसुनी घाटात अपघाताची भीषण घडला घडली असून ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ओपेरा पार्टीचा ट्रक ...

5 killed and 8 injured in a terrible accident, truck overturned in Dwarsuni ghat mayurbhanj odisha | भीषण अपघातात ५ ठार ८ जखमी; द्वारसुनी घाटात ट्रक पलटी

भीषण अपघातात ५ ठार ८ जखमी; द्वारसुनी घाटात ट्रक पलटी

मयूरभंज - ओडिशातील द्वारसुनी घाटात अपघाताची भीषण घडला घडली असून ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ओपेरा पार्टीचा ट्रक पलटी झाल्याने ही दुर्घटना घडली असून यात ५ जण ठार झाले आहेत, तर ८ जण जखमी आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच बंगिरीपोसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

धौली गणनाट्याच्या सदस्यांना घेऊन हा ट्रके राष्ट्रीय महामार्ग ४९ वरुन जात असताना द्वारसुनी घाटाजवळ ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळाताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींना तत्काळ बांगिरीपोसी येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू असून अधिक तपास करत आहेत. 
 

 

Web Title: 5 killed and 8 injured in a terrible accident, truck overturned in Dwarsuni ghat mayurbhanj odisha