गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 09:08 IST2018-08-18T09:03:45+5:302018-08-18T09:08:49+5:30

गुजरातच्या खेडा जिल्ह्यात शुक्रवारी भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.

5 died in road accident between auto rickshaw and truck in gujarat | गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

आणंद - गुजरातच्या खेडा जिल्ह्यात शुक्रवारी (17 ऑगस्ट) भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील महुधा-कथलाल मार्गावर  हा भीषण अपघात झाला. रस्त्यावरील एका रिक्षाला उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षातील चार प्रवासी आणि चालकाचा मृत्यू झाला. तसेच ट्रकची धडक जोरदार असल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

अपघातातील मृत्यू झालेले सर्वजण खेडा जिल्ह्यातील एकाच गावचे रहिवासी आहेत. फारुख चौहान (रिक्षा चालक), नजीर चौहान, इरशाद चौहान, सलीम भथियारा आणि यासीन भथियारा अशी रिक्षातील मृत व्यक्तींची नावे आहेत

Web Title: 5 died in road accident between auto rickshaw and truck in gujarat