शहरं
Join us  
Trending Stories
1
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
2
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
5
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
6
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
7
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
10
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
11
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
12
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
13
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
14
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
15
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
16
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
17
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
18
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
19
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
20
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट

बापरे! कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 50000 समीप; धोका प्रचंड वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 4:31 AM

देशात ४८,९१६ नवे रुग्ण, रुग्ण १३ लाखांवर । बळींचा आकडा ३१,३५८

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये शनिवारी एकाच दिवसात कोरोनाचे ४८,९१६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १३ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. दोन दिवसांत देशात ९६ हजारांवर नवे रुग्ण आढळून आले होते. शनिवारी ७५७ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३१,३५८ झाली आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, उपचारांनंतर पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,४९,४३१ झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या १३,३६,८६१ झाली असून त्यातील ४,५६,०७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण कोरोना रुग्णांपैकी पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.५४ टक्के आहे. देशात सलग तिसºया दिवशी कोरोनाचे ४५ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे ४९,३१० रुग्ण तर शनिवारी ४८ हजारांवर रुग्ण आढळले. त्यामुळे दोन दिवसांत ९६ हजारांवर रुग्णांची भर पडली आहे.कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. शनिवारी बळी गेलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील २७८ जणांचा समावेश आहे.

१ कोटी ५८ लाखांवर चाचण्याइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने सांगितले की, देशात शुक्रवारी कोरोनाच्या ४,२०,८९८ चाचण्या करण्यात आल्या. आजवर एकाच दिवसात इतक्या चाचण्या कधीही करण्यात आल्या नव्हत्या. देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या १,५८,४९,०६८ इतकी झाली आहे.बरे झाल्यानंतरही दीर्घकालीन विकारकोरोना आजारातून पूर्णपणे बरे झाल्यावरही काहींना श्वसन, हृदय, यकृत किंवा डोळ्यांशी संबंधित दीर्घकालीन त्रास जाणवू लागतात. अशांना मदत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य खाते मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत असल्याची माहिती खात्याचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी दिली आहे. असे विकार आटोक्यात ठेवण्याकरिता किंवा त्यातून बरे होण्याकरिता काय काळजी घ्यायची याची माहिती या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या