शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

राज्यसभेच्या ५६ पैकी ४१ जागा बिनविरोध, आता १५ जागांसांठी होणार मतदान, कुठल्या आहेत त्या? जाणून घ्या...  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 1:40 PM

Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या ४१ जागांवर प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असल्याने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र  राज्यसभेच्या १५ जागांवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरातील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या अखेरच्या दिवशी ४१  जागांवरील चित्र स्पष्ट झालं असून, या ४१ जागांवर प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात असल्याने हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र  राज्यसभेच्या १५ जागांवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेची निवडणूक होणाऱ्या या १५ जागांमध्ये उत्तर प्रदेशमधील १०, हिमाचल प्रदेशमधील एक आणि कर्नाटकमधील ४ जागांचा समावेश आहे.

मंगळवारी राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवड जाहीर झालेल्या ४१ उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपात नव्याने आलेले अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल. मुरुगन यांचा समावेश आहे.  तसेच बिनविरोध निवड झालेल्या ४१ जागांपैकी २० जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने ६, तृणमूल काँग्रेसने ४, वायएसआर काँग्रेसने ३, आरजेडीने २,  बीजेडीने २ आणि शिवसेना, बीआरएस आणि जेडीयूने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. या जागांवर अन्य उमेदवार नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयी घोषित केले.

५६ पैकी ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उर्वरित १५ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यात उत्तर प्रदेशमधील १० जागांसाठी मतदान होणार आहे. येथील पक्षीय बलाबलानुसार भाजपाचे ७ आणि समाजवादी पक्षाचे ३ उमेदवार विजयी होणार होते. मात्र भाजपाने आठवा उमेदवार दिल्याने निवडणूक रंगतदार झाली आहे. आठही उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजपाला २९६ मतांची आवश्यकता आहे. मात्र सध्या भाजपाकडे २८६ आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपाला आठवी जागा निवडून आणण्यासाठी १० अतिरिक्त मतांची गरज आहे.  तर समाजवादी पक्षाला तीन उमेदवार विजयी करण्यासाठी १११ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या दोन आणि बसपाच्या एका आमदाराचं मत निर्णायक ठरणार आहे.

हिमाचल प्रदेशमधील एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. ६८ विधानसभा सदस्य असलेल्या हिमाचलमध्ये विजयासाठी ३५ मतांची आवश्यकता आहे. येथे काँग्रेसकडे ४० आमदार आहेत. तर ३ आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत ४० आमदार असलेल्या काँग्रेसचा विजय निश्चित आहे.

कर्नाटकमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी काँग्रेसने ३ आणि भाजपा-जेडीएस आघाडीने २ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. विधानसभेचे २२४ सदस्य असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे १३५ आमदार आहेत. तर भाजपाचे ६६ आणि जेडीएसचे १९ आमदार आहेत. दोन अपक्ष आणि इतर ४ आमदार आहेत. येथील मतांचं गणित पाहता भाजपाच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित आहे. तर काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी होऊ शकतात. मात्र क्रॉस व्होटिंग झाल्यास येथील निवडणूक रंगतदार होऊ शकते. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटकUttar Pradeshउत्तर प्रदेशHimachal Pradeshहिमाचल प्रदेश