4000 declaration of cm shivraj in kisan samman nidhi and the state government | मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी

मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी

ठळक मुद्देमध्य प्रदेश विधानसभेच्या २७ जागा रिक्त आहेत.भाजपाला राज्यातील सरकार वाचवण्यासाठी या रिक्त जागांवरील कमीत कमी नऊ जागांवर विजय मिळवणे गरजेचे आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशात येत्या काही दिवसांत पोटनिवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुकीपूर्वी येथील शिवराज सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता दर वर्षाला १० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दर वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. त्यामध्ये आता मुख्यमंत्री किसान सम्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला दोन हप्त्यामध्ये चार हजार रुपये देण्यात येणार आहेत, असे शिवराजसिंह चौहान यांना सांगितले.

दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभेच्या २७ जागा रिक्त आहेत. भाजपाला राज्यातील सरकार वाचवण्यासाठी या रिक्त जागांवरील कमीत कमी नऊ जागांवर विजय मिळवणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील आगामी पोटनिवडणुका कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका नाहीत किंवा केवळ पोटनिवडणूक नाहीत तर 'राज्याचे भविष्य ठरविण्याची निवडणूक' आहे, असे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नुकतेच म्हटले आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पोटनिवडणुकीत विजय मिळावा, यासाठी शिवराज सरकार प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीव शिवराज सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना भेट दिली आहे. शिवराज सरकारच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना आता सन्मान निधी म्हणून १० हजार रुपये मिळणार आहेत. यापूर्वी शिवराज सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मात्र, अनेक शेतकर्‍यांनी एक रुपया, पाच रुपये माफ केले होते, त्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली होती.

शिवराजसिंह चौहान यांचे टेंपररी मुख्यमंत्री विधान
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वत: ला टेंपररी (ताप्तुरते) मुख्यमंत्री म्हणण्याचे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चौहान रविवारी मंदसौर जिल्ह्यातील सुवासरा विधानसभा मतदार संघातील सीतामऊ येथे होते. त्यांनी येथील विविध विकास कामांचे लोकापर्ण केले. सुवासरा जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी 
मोदी सरकारने देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९३ हजार कोटी पाठविले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकारने इतकी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांसाठी दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme)  माध्यमातून हे शक्य झाले आहे. या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये केली होती. आतापर्यंत सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. 

आणखी बातम्या...

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

-   मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो    

-  जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन    

- "येत्या पाच वर्षांत ९४८८ वैमानिकांची आवश्यकता भासणार"    

- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन    

- गायिका अन् नायिका... आशालता वाबगावकर यांचा जीवनप्रवास    

- आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२० - मीनसाठी काळजीचा अन् मिथुनसाठी आनंदाचा दिवस    

- काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन 

- Bhiwandi building collapse : भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 4000 declaration of cm shivraj in kisan samman nidhi and the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.