Today's horoscope - 22 September 2020 | आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२० - मीनसाठी काळजीचा अन् मिथुनसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य - २२ सप्टेंबर २०२० - मीनसाठी काळजीचा अन् मिथुनसाठी आनंदाचा दिवस

मेष
आज सांसारिक बाबींपासून दूर राहून आध्यात्मिक विषयात मग्न राहाल. त्यामध्ये गहन चिंतनशक्ती आपणाला मदत करेल. गूढ आणि रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. आणखी वाचा

वृषभ
कुटुंबीयांसमवेत सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्‍यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

मिथुन
कुटुंबीयांसमवेत आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची पण आज शक्यता आहे. महत्त्वाच्या विषयांवर खर्च होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील.  आणखी वाचा

कर्क
मित्र आणि संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळा. शक्य असेल तर प्रवासही करू नका. आणखी वाचा

सिंह
उक्ती आणि कृती यावर संयम ठेवून वादविवादापासून बचाव करावा. आईशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मनावर वैचारिक दृष्टीने नकारात्मकतेचा पगडा राहील. आणखी वाचा

कन्या
शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळे आज मनाला शांततेचा लाभ मिळेल. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याशी असणारे संबंधात माधुर्य वाढेल. आणखी वाचा

तूळ
द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे जमणार नाही. महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस चांगला नाही.  आणखी वाचा

वृश्चिक
आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल. आणखी वाचा

धनु
उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवला नाही तर आपत्ती येण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिकदृष्ट्या चिंतेत राहाल. आणखी वाचा

मकर
आजचा दिवस लाभदायक आहे. सगेसोयरे आणि मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहोत्सुकांना इच्छित साथीदार लाभल्याने आनंद वाटेल. आणखी वाचा

कुंभ
आज शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. आणखी वाचा

मीन
शारीरिक कंटाळा आणि मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका आणि मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 22 September 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.