शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

भारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 09:10 IST

भारतामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देभारतामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणेच्या एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली आहे.राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादी भारतात शिरल्याची शक्यता

जयपूर -  भारतामध्येपाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिरोही, राजस्‍थानच्या पोलीस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतीय सीमेत घुसले आहेत. दहशतवादी कोणत्याही क्षणी घातपात घडवू शकतात. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात याबाबतचे एक पत्र पाठवण्यात आले आहे. पत्र मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गर्दीची ठिकाणं, हॉटेल्स, ढाबा, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच संशयित वाहनं आणि संशयित व्यक्तींवरही नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत याआधी 9 ऑगस्ट रोजी हाय अलर्ट दिला होता. यामध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या आहेत. 

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील घडामोडींनंतर मुंबईसह देशातील 15 मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थी व आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता मुंबई पोलिसांसह सर्व तपास यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शिघ्रकृती दल, फोर्स वन यांच्याकडून शहरात जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी संशयित व्यक्ती, वस्तू, सामान, वाहने यांची कसून तपासणी सुरू केली आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानRajasthanराजस्थानPoliceपोलिस