शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका; जेवण करण्यासाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, चहाची किंमत तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 10:56 AM

तिकीट सिस्टिममध्ये हे नवीन दर १५ दिवसांत अपडेट होतील. पुढील ४ महिन्यांनंतर हे नवे दर लागू होणार आहे.

मुंबई - रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण रेल्वेत चहा, नाश्ता आणि जेवण करण्यासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे बोर्डाने याबाबत एक परिपत्रक काढलं आहे ज्यात राजधानी शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढविण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये तिकीट घेताना चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसेही द्यावे लागतात. 

राजधानी, दुरांतो आणि शताब्दी ट्रेनमध्ये लागू करण्यात आलेले नवीन दर सेकंड क्लासमधील प्रवाशांसाठी चहा १० रुपयांऐवजी २० रुपये, स्लीपर क्लास १५ रुपये, दुरांतो एक्सप्रेस स्लीपर क्लासमध्ये पूर्वी नाश्ता आणि जेवण ८० रुपयांना मिळत होतं. ते आता १२० रुपये झालं आहे. तर संध्याकाळचा चहा २० रुपयांऐवजी ५० रुपये होणार आहे. 

तिकीट सिस्टिममध्ये हे नवीन दर १५ दिवसांत अपडेट होतील. पुढील ४ महिन्यांनंतर हे नवे दर लागू होणार आहे. राजधानी एक्सप्रेस फर्स्ट क्लासमध्ये पूर्वी जेवण १४५ रुपयांना होतं त्याचे नवीन दर २४५ रुपये असणार आहेत. त्यामुळे या नवीन दराचा फटका सर्वसामान्यांना होणार आहे. तसेच याव्यतिरिक्त असणाऱ्या एक्सप्रेस, मेलमध्ये शाकाहारी जेवण पूर्वी ५० रुपयांना मिळत होतं त्यासाठी आता ८० रुपये मोजावे लागणार आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने एग्ज बिरयानी ९० रुपये, चिकन बिरयानी ११० रुपये मोजावे लागणार आहेत. 

सकाळच्या चहापेक्षा संध्याकाळचा चहा जास्त महाग का? यावर एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, संध्याकाळच्या चहासोबत रोस्टेड नट्स, स्नॅक्स आणि मिठाई हेदेखील दिलं जातं. आमची रेल्वे कॅटरिंग सेवा आणखी सुधारणार आहे. त्यासाठी हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. २०१४ मध्ये हे दर बदलण्यात आले होते. आयआरसीटीसीचा आग्रह आणि बोर्डाच्या शिफारशीनंतर या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवास करताना जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. याबाबत प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचंही दिसून येत आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेMONEYपैसाIRCTCआयआरसीटीसी