टायर फुटला अन्...! २ बसेसची समोरासमोर धडक, ४ ठार, ७० जखमी; मुख्यमंत्र्यांकडून भरपाई जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 14:05 IST2023-06-19T14:03:17+5:302023-06-19T14:05:05+5:30

तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील मेलपट्टमपक्कम येथे दोन खासगी बसेसचा भीषण अपघात झाला.

4 killed, 70 injured as 2 buses collide head-on in Melpattampakkam of Cuddalore district of Tamil Nadu CM announces mk stalin compensation | टायर फुटला अन्...! २ बसेसची समोरासमोर धडक, ४ ठार, ७० जखमी; मुख्यमंत्र्यांकडून भरपाई जाहीर

टायर फुटला अन्...! २ बसेसची समोरासमोर धडक, ४ ठार, ७० जखमी; मुख्यमंत्र्यांकडून भरपाई जाहीर

कुड्डालोर (तामिळनाडू: तामिळनाडूतील कुड्डालोर जिल्ह्यातील मेलपट्टमपक्कम येथे दोन खासगी बसेसचा भीषण अपघात झाला. दोन बसेसच्या धडकेत सुमारे ७० लोक जखमी झाले असून ४ जण दगावले आहेत. जखमींना कुड्डालोरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात दोन बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण रस्ता अपघातात चार जण ठार आणि ७० जण जखमी झाले, असे वृत्त इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने दिले आहे.

दरम्यान, कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील पट्टमबक्कम येथे हा अपघात झाला. एका बसचा पुढील टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि समोरील बाजूने येणाऱ्या दुसऱ्या बसची समोरासमोर धडक झाली. रूग्णवाहिका येण्यापूर्वीच जखमींना स्थानिकांनी कुड्डालोरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि उपचार घेत असलेल्यांना ५०,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. 

Web Title: 4 killed, 70 injured as 2 buses collide head-on in Melpattampakkam of Cuddalore district of Tamil Nadu CM announces mk stalin compensation