4 Death & 27 injured in collapse of temple wall in west bengal | West Bengal Wall Collapsed: मंदिराची भिंत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 27 जखमी 
West Bengal Wall Collapsed: मंदिराची भिंत कोसळून 4 जणांचा मृत्यू, 27 जखमी 

कोलकाता - देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव उत्साहात सुरू असताना या उत्सवाला पश्चिम बंगालमध्ये गालबोट लागले आहे. बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यात जन्माष्टमीचा उत्सव सुरू असताना मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकोळ जखमी असलेल्यांना 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

English summary :
Wall of a temple collapsed in West Bengal: Four people have been died in an accident and 27 people were injured. West Bengal Chief Minister Mamata Banerjee has expressed regret. Rs 4 lakh will be provided to the relatives.


Web Title: 4 Death & 27 injured in collapse of temple wall in west bengal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.