लुधियानामध्ये कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, चार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 09:57 IST2018-10-10T09:34:03+5:302018-10-10T09:57:04+5:30

लुधियानाच्या कल्याण नगरमधील कपड्याच्या एका कारखान्याला भीषण आग  लागल्याची घटना समोर आली आहे.

4 dead after fire broke out at a hosiery factory in Kalyan Nagar in Ludhiana | लुधियानामध्ये कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, चार जणांचा मृत्यू

लुधियानामध्ये कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, चार जणांचा मृत्यू

लुधियाना - लुधियानाच्या कल्याण नगरमधील कपड्याच्या एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी (10 ऑक्टोबर) पहाटे 4.15 च्या सुमारास तीन मजली कारखान्याला आग लागली. 


आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्याचा मालक रात्री बाहेरून या कारखान्याला ताळे लावून जात असे. त्यामुळचे आग लागली त्यावेळी कारखान्यातील कामगारांना बाहेर पडता आलं नसल्याची माहिती मिळत आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. 

Web Title: 4 dead after fire broke out at a hosiery factory in Kalyan Nagar in Ludhiana