शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

देशभरात रेल्वे तिकीटांचा काळाबाजार, ३८७ एजंट अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 19:06 IST

मागील दोन महिने शाळा-महाविद्यालयांची उन्हाळी सुट्टी, लग्नाचे मुहूर्त यांमुळे सर्वच रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती..

ठळक मुद्देमध्य रेल्वेकडून ३५ जणांवर कारवाई ६८ लाख २५ हजार ४९९ रुपये किंमतीची ३ हजार ५१५ तिकीटे जप्त ३८७ जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल

पुणे : रेल्वे सुरक्षा दल व इतर विभागांनी देशभरात ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत एकाच दिवशी केलेल्या कारवाईत रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारे जाळे उध्वस्त केले. देशभरातून तब्बल ३८७ तिकीट एजंटांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे ३३ लाख रुपयांची तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी यापुर्वी ३ कोटी २५ लाख रुपये किंमतीची तिकीटे बेकायदेशीरपणे विकल्याचेही समोर आले आहे.मागील दोन महिने शाळा-महाविद्यालयांची उन्हाळी सुट्टी, लग्नाचे मुहूर्त यांमुळे सर्वच रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. लांबपल्ल्याच्या बहुतेक गाड्या प्रवाशांनी भरून धावत होत्या. या काळात काही जणांकडून तिकीटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. काही तिकीट एजंट तिकीट खिडकीसह ई-तिकीटींग सुविधेचा दुरूपयोग करून तिकीट खरेदी करून प्रवाशांना जादा दराने विकत होते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत होत्या. यापार्श्वभुमीवर रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरूण कुमार यांनी रेल्वेच्या तांत्रिक व आयटी कक्षाच्या मदतीने संबंधित तिकीट एजंटांची माहिती जमा केली. त्यानंतर त्यांनी देशभरात एकाच दिवशी त्यांच्याविरूध्द कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईला ‘ऑपरेशन थंडर’ असे नाव देण्यात आले. त्यानुसार दि. १३ जून रोजी एकाच दिवशी १४१ शहरांमधील २७६ ठिकाणी छापा टाकण्यात आला. विविध ठिकाणी ३८७ जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३२ लाख ९९ हजार ९३ रुपयांची २२ हजार २५३ तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. या एजंटांनी यापुर्वीही तब्बल ३ कोटी २४ लाख १२ हजार ७०६ रुपये किंमतीची तिकीटांचा काळाबाजार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईअंतर्गत ३७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संशयित युझर आयडी आणि जप्त तिकीटे निष्क्रीय करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोटा (राजस्थान) येथून ‘एएनएमएस’ आणि रेड मिर्ची ही संगणक प्रणाली जप्त करण्यात आली आहे. भविष्यातही अशी कारवाई करण्याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सुचना दिल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.  -----------

मध्य रेल्वेकडून ३५ जणांवर कारवाई

‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मध्य रेल्वेकडून करण्यात आलेल्या कारवाईत ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६८ लाख २५ हजार ४९९ रुपये किंमतीची ३ हजार ५१५ तिकीटे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये यापुर्वीच्या प्रवासाची ६२ लाख ८० हजार ८९१ रुपये किंमतीची तिकीटे आहेत. तर उर्वरीत ५ लाख ४४ हजार ६०८ रुपये किंमतीची तिकीटे यापुढील प्रवासाची आहेत. ही कारवाई पुण्यासह चिंचवड, पिंपरी, घाटकोपर, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, नागपुर, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, शिर्डी, सोलापुर आणि सांगली या ठिकाणच्या २१ खासगी ट्रॅव्हल एजन्सी आणि १२ आरक्षण केंद्रांमध्ये करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेticketतिकिटfraudधोकेबाजीArrestअटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस