शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:28 IST

Govt issues notification for Census: केंद्र सरकारने १६व्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने १६व्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली असून, त्यामध्ये जातनिहाय गणनेचाही समावेश आहे. ही जनगणना २०२७ मध्ये होणार आहे. २०११ नंतर तब्बल १६ वर्षांनी जनगणना पार पडेल. २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेत देशभरातून लोकसंख्येशी संबंधित आकडेवारी गोळा केली जाईल. या प्रक्रियेत सुमारे ३४ लाख गणक, पर्यवेक्षक तसेच सुमारे १.३ लाख जनगणना अधिकारी सामील होतील. डिजिटल साधनांचा या प्रक्रियेत अधिकाधिक वापर करण्यात येईल. नागरिकांना स्वयंनोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. ही भारताची १६वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असेल.

देशातील लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यांतील बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये जनगणना १ ऑक्टोबर २०२६ ही तर इतर भागांमध्ये ती १ मार्च २०२७ ही संदर्भ तारीख मानून केली जाणार आहे. जनगणनेसाठी करावयाच्या पूर्वतयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी आढावा घेतला. त्या बैठकीला गृहमंत्रालयाचे सचिव, जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जनगणनेचे दोन टप्पेपहिला टप्पा: प्रत्येक घरात किती जणांचे वास्तव्य आहे, तेथील मालमत्ता, सुविधा यांची माहिती गोळा करणे. दुसरा टप्पा: ‘लोकसंख्या गणना’ म्हणजे प्रत्येक व्यक्तीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर माहिती संकलित करणे. 

अधिसूचना हा फुसका बारही अधिसूचना हा फुसका बार असल्याचे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोमवारी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, या अधिसूचनेत जातनिहाय गणनेचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे या मुद्द्यावर केंद्राने पुन्हा एकदा घुमजाव केले आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. 

आमचे सर्वेक्षण वेगळे: कर्नाटक कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांगितले की, राज्य सरकारकडून करण्यात येणारे सामाजिक-शैक्षणिक आणि जातीविषयक सर्वेक्षण हे केंद्र सरकारच्या जातनिहाय गणनेपेक्षा खूप वेगळे आहे. कर्नाटक सरकारने नव्याने जातनिहाय गणना करण्याचा निर्णय घेऊन ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि ‘भाजप’चे नेते भूपेंद्र यादव यांनी केला.

बहुतांश राजकीय पक्षांना हवी जातीनिहाय जनगणना२०१० मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मंत्रिमंडळासमोर आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मंत्रिगट स्थापन झाला. बहुतांश राजकीय पक्षांनी जातीनिहाय जनगणना घेण्याची शिफारस केली होती. यूपीए सरकारने २०११ मध्ये जातींवर आधारित जनगणनेऐवजी सामाजिक-आर्थिक व जातीय सर्वेक्षण केले. जातीविषयक काही माहिती यात गोळा झाली, पण ती पूर्ण प्रसिद्ध झाली नाही.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार