हिमाचल, बिहारमध्ये अपघातांत 32 ठार

By Admin | Updated: July 30, 2014 00:55 IST2014-07-30T00:55:45+5:302014-07-30T00:55:45+5:30

हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण दुर्घटनांमध्ये 32 ठार, तर 29 जण जखमी झाले.

32 killed in accidents in Himachal, Bihar | हिमाचल, बिहारमध्ये अपघातांत 32 ठार

हिमाचल, बिहारमध्ये अपघातांत 32 ठार

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण दुर्घटनांमध्ये 32 ठार, तर 29 जण जखमी झाले. हिमाचलमध्ये बस दरीत कोसळली, तर बिहारमध्ये अनियंत्रित ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना चिरडले.
बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात नवी दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जाणा:या ट्रकचे नियंत्रण सुटून त्याने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 12 भाविकांना चिरडल्याची भीषण घटना येथे घडली. 
यात पाच ियांचा समावेश आहे.  कावड घेऊन जाणारे हे भाविक मंदिरातून परतत असताना रस्त्याच्या कडेला विश्रंती घेत होते. या अपघातात 22 जण जखमी झाले आहेत. 
पोलीस अधीक्षक उपेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरापासून 1क् कि.मी. दूर असलेल्या मुफलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. हा वजनदार ट्रक आपले नियंत्रण हरवून बसल्याने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या या भाविकांच्या अंगावरून गेला व एका बसवर जाऊन आदळला. या बसमध्येही काही भाविक विश्रंती घेत होते. या अपघातात 12 जण जागीच ठार झाले तर 22 जण जखमी 
झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून या अपघाताची चौकशी सुरू आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सिमला : हिमाचलमधील बसंतपूर- किंगाल महामार्गावरील कटारघाट येथे बस दरीत कोसळून 2क् जण ठार तर 7 प्रवासी जखमी झाले. हिमाचल राज्य परिवहन महामंडळाच्या या बसमध्ये 3क् पेक्षा जास्त प्रवासी होते. 
 
च्ही बस सावेरखुडहून सिमल्याला जात होती. 17 जणांचे मृतदेह सापडले असून बसच्या सांगाडय़ात आणखी काही जण अडकून असण्याची शक्यता आहे. सात जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सिमल्याचे पोलीस अधीक्षक डी. डब्ल्यू नेगी यांनी सांगितले. बसच्या चालकाने बाहेर उडी घेत स्वत:चा जीव वाचवला. मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य राबविण्याचा आदेश दिला.

 

Web Title: 32 killed in accidents in Himachal, Bihar