१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 06:59 IST2025-05-10T06:46:06+5:302025-05-10T06:59:38+5:30
गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव सुरू आहे.

१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भार आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तानमधील ९ ठिकाणी हल्ले केले. दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला असून आता देशातील ३२ विमानतळ बंद करण्यात आली आहेत.
नागरी उड्डाण मंत्रालयाने देशातील ३२ विमानतळांवर देशांतर्गत उड्डाणांच्या वाहतुकीवरील बंदी १४ मे रोजी सकाळी ५.२९ वाजेपर्यंत वाढवली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. या विमानतळांवरून उड्डाणे चालविली जाणार नाहीत.
पंजाबमधील अमृतसर, लुधियाना, पटियाला, भटिंडा, हलवारा, पठाणकोट विमानतळ बंद राहतील, तर हिमाचल प्रदेशातील भुंतर, शिमला, कांगडा-गग्गल विमानतळ बंद राहतील. केंद्रशासित प्रदेशातील चंदिगड विमानतळ, श्रीनगर, जम्मू, जम्मू-काश्मीरचे लेह विमानतळ आणि राजस्थानचे लडाख, किशनगड, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर विमानतळ आणि गुजरातचे मुंद्रा, जामनगर, हिरासर, पोरबंदर, केशोद, कांडला, भुज विमानतळ बंद राहतील.
एअर इंडिया आणि इंडिगोने अनेक विमानतळांवरील उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोने ग्राहकांना फ्लाइटची स्थिती तपासण्यासाठी, रीबुकिंग करण्यासाठी किंवा परतावा मिळविण्यासाठी लिंक्स शेअर केल्या आहेत. भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. दरम्यान, एअरमनला नोटीस जारी करण्यात आली आहे. पाकिस्तानने काल रात्री जम्मू, पंजाब आणि राजस्थानच्या भागांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले.
या विमानतळावरील सेवा बंद
1. अधमपूर
2. अंबाला
3. अमृतसर
4. अवंतीपूर
5. भटिंडा
6. भुज
7. बिकानेर
8. चंदीगड
9. हलवारा
10. हिंडन
11. जैसलमेर
12. जम्मू
13. जामनगर
14. जोधपूर
15. कांडला
17. कांडला
18. किशनगड
19. कुल्लू मनाली (भुंतर) 20. लेह
21. लुधियाना
22. मुंद्रा
23. नलिया
24. पठाणकोट
25. पटियाला
26. पोरबंदर
27. राजकोट (हिरासर)
28. सरसावा
29. शिमला
30. श्रीनगर
31. थोइस
32. उत्तरलाई
सर्व प्रवाशांसाठी सेकंडरी लॅडर पॉइंट चेक अनिवार्य करण्यात आले आहे. पर्यटकांचा प्रवेश पूर्णपणे निलंबित करण्यात आला आहे. एअर मार्शल तैनात केले जात आहेत.