शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी ३१०० टँकर

By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST

मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी ३१०० टँकर

मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी ३१०० टँकर
टँकरच पर्याय : मागणी होईल तेथे टँकरने पाणीपुरवठा
औरंगाबाद : मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. विभागात शनिवारअखेर औरंगाबाद जिल्ह्यात ५०२ गावे व १७ वाड्यांसाठी ७१० टँकरद्वारे, जालन्यात ४०० गावे आणि ६३ वाड्यांसाठी ४५० टँकर, परभणीत १४९ गावे, ३७ वाड्यांसाठी २०० टँकर, हिंगोलीत २७ गावांमध्ये ३० टँकर, नांदेडमध्ये १८८ गावे, १३८ वाड्यांसाठी ३१० टँकर, बीडमध्ये ६२१ गावे आणि ५३४ वाड्यांसाठी ८०० टँकर, लातूरमध्ये १९३ गावे, ४३ वाड्यांसाठी २६० टँकर, तर उस्मानाबादमध्ये २३८ गावे आणि १३ वाड्यांसाठी ३४० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. विभागात एकूण ६ हजार ५०० खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मागील आठवड्यात २१०० गावे आणि ७८५ वाड्यांना २,८५६ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते.
मराठवाड्यातील सर्व पाणीपुरवठ्याच्या योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षी टँकरने पाणीपुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक आहे. त्यामुळे मागणी येईल तेथे टँकरने पाणी दिले जात आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पारा ४० अंश सेल्शिअसच्या पुढे सरकत असल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे ४३ लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.