शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला मारहाण करून ३० हजार लुटले मध्यरात्रीची घटना : तीन महिन्याच्या कष्टाच्या रकमेवर डल्ला

By admin | Updated: June 8, 2016 18:35 IST

जळगाव: मुंबई येथून जळगावला घरी आलेल्या शुभम गणेश टेकावडे (वय २० रा.शाहू नगर, जळगाव) या तरुणाला बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉप चौकात पाच तरुणांनी मारहाण करुन ३० हजार रुपये लुटून नेले. तक्रार देण्यासाठी गेलेल्या या तरुणाची रात्री व सकाळीही पोलिसांनी साहेब नसल्याचे कारण सांगत तक्रार घेतली नाही.

जळगाव: मुंबई येथून जळगावला घरी आलेल्या शुभम गणेश टेकावडे (वय २० रा.शाहू नगर, जळगाव) या तरुणाला बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा स्टॉप चौकात पाच तरुणांनी मारहाण करुन ३० हजार रुपये लुटून नेले. तक्रार देण्यासाठी गेलेल्या या तरुणाची रात्री व सकाळीही पोलिसांनी साहेब नसल्याचे कारण सांगत तक्रार घेतली नाही.
शुभम हा उरण, नवी मुंबई येथील जेएनपीटी, बोकडविरा येथे नवा शिवा या बंदरावर दहा हजार रुपये महिन्याने कामाला आहे. मुहूणे तेथे कामाला असल्याने चार महिन्यापूर्वीच तो तेथे कामाला लागला. सुरुवातीला एक महिन्यानंतर तो घरी आला होता. आता तीन महिन्यानेच तो घरी आला. तीन महिन्याचा पगार घेऊन तो मंगळवारी रात्री कल्याण येथून पुणे-नागपूर या एक्सप्रेसने जळगावात अडीच वाजता उतरला. स्टेशनच्या बाहेर चहा घेतल्यानंतर शाहू नगर जवळच असल्याने रिक्षा न करता तो पायीच चालत आला. खान्देश कॉम्प्लेक्सजवळ आल्यावर समोर पद्मालय विश्रामगृहाकडे जाणार्‍या रस्त्याजवळ विरुध्द दिशेने पाच तरुण उभे होते. तो सरळ पुढे गेला, गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ पुन्हा हेच तरुण सिगारेट ओढताना दिसले. तीन एका दुचाकीवर तर दोन जण दुसर्‍या दुचाकीवर होते. त्यांच्याकडे लक्ष न देता तो पुढे चालतच गेला.
ल‹ा क्लासेस्च्या समोर अडविले
याच परिसरात असलेल्या ल‹ा क्लासेस्जवळ तिघांनी त्याला अडविले. त्यापैकी एकाने शंभर रुपये मागितले, त्याने नकार दिला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यापैकी एकाजवळ चॉपर होता, तर दुसर्‍या दुचाकीवरील दोघांनी त्याची बॅग घेवून पळ काढला. त्या बॅगेत तीन महिन्याच्या पगाराचे तीस हजार रुपये होते.
रिंगरोड परिसरात घेतला शोध
या घटनेनंतर शुभम हा रिक्षाने घरी पोहचला. चौकात असलेल्या गल्लीतील काही मित्रांना त्याने हा प्रकार सांगितला असता त्यांनी रिंगरोडच्या दिशेने त्या चोरट्यांचा शोध घेतला. त्याच वेळी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याने हा प्रकार सांगितला, त्यांनाही वर्णनावरुन चोरट्यांना शोधले. शेवटी साडे तीन वाजेच्या सुमारास शुभम शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला. शहर पोलिसांनीही त्याला सोबत घेवून घटनास्थळावर आणले. तेथे एका सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली असता दोन दिवसापूर्वीही दोन वेळा अशाचा मारहाण व लूटमारीच्या घटना घडल्याचे त्याने सांगितले.