शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये 48 तासांत 30 मुलांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 10:33 PM

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील बाबा राघवदास (बीआरडी) मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत.

गोरखपूर - उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील बाबा राघवदास (बीआरडी) मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. गेल्या आठवड्यात बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत येथे उपचारांसाठी आलेल्या सुमारे 30 मुलांचा मृत्यू झाला.  ज्या 30 मुलांचा मृत्यू झाला त्यापैकी 15  मुले ही अतिदक्षता विभागात भरती होती. तर अन्य 15 मुले बालरोग विभागात दाखल होते. गुरुवारी  25 नव्या रुग्णांना एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तर पीआयसीयूमध्ये 66 मुलांना दाखल करण्यात आले होते. मेडिकल कॉलेजच्या आकडेवारीवर नजर टाकली तर गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत 10 मुलांना भरती करण्यात आले होते. या दहा मुलांमधील 8 मुलांचा एआयसीयूमध्ये मृत्यू झाला. एनआयसीयूमध्ये येथे 36 मुलांना दाखल करण्यात आले होते. त्यातील दहा मुलांचा मृत्यू झाला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात येथे 599 मुलांचा मृत्यू एनआयसीयू आणि पीआयसीयूमध्ये झाला होता.  बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या महिन्यात चार दिवसांमध्ये ६९ मुलांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या नोंदीनुसार १० ऑक्टोबर रोजी १९, नऊ तारखेला १८, आठ तारखेला २० आणि १२ मुलांचा मृत्यू ७ ऑक्टोबरला झाला.  ऑगस्टमध्ये २९० बालमृत्यू झाले. त्यापैकी एका दिवसात ६० मुलांचा मृत्यू झाला होता. मुलांना प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या रुग्णालयाला प्राणवायूच्या सिलिंडरचा पुरवठा करणाºयाचे बिल दिले न गेल्यामुळे त्याने पुरवठा थांबवला, असाही आरोप आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला व चौकशीही झाली. आॅक्सिजन पुरवठादाराला अटकही झाली होती.

टॅग्स :GorakhpurगोरखपूरDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ