बकऱ्याचा बळी देताना ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, गावात शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 16:27 IST2022-10-05T16:26:37+5:302022-10-05T16:27:24+5:30
बकऱ्याचा बळी देतानाच्या हत्याराचा तुकडा उडून चिमुकल्यास लागला होता

बकऱ्याचा बळी देताना ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, गावात शोककळा
झारखंडच्या गुमला जिल्ह्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. दुर्गा पुजेसाठी बकऱ्याचा बळी देत असताना लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवमीच्या मुहूर्तावर बकरं बलिदान देण्याची प्रथा असते. त्यानुसार, बकरं बलिदान देत असताना बळी देण्यात येणाऱ्या हत्याराचा तुकडा कट होऊन तीन वर्षांच्या चिमकुल्याला लागला. त्यामुळे, तो लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. या दुर्घटनेत चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला.
बकऱ्याचा बळी देतानाच्या हत्याराचा तुकडा उडून चिमुकल्यास लागला होता. त्यानंतर, त्या मुलास रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनं परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. तर, लहान मुलाच्या आई-वडिलांना टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या अगोदर नवमीला बकरं बलिदान देण्यात येतं. गुमला जिल्ह्यातील एका गावात दुर्गापुजेत बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यानुसार, दोन बकऱ्यांचा बळी देण्यात आला होता. मात्र, तिसऱ्या बकऱ्याचा बळी देत असताना हत्याचा तुकडा तुटला आणि जवळच उभा असलेल्या दिपक उरांव यांच्या ३ वर्षीय चिमुकल्यास लागला. त्यानंतर, काही वेळांतच लहानग्याचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.