शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

2 जी घोटाळयाचा निकाल राजकीय अस्पृश्यता संपवणार, करुणानिधी मोदींबरोबर राजकीय मैत्री करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 13:38 IST

2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे द्रमुकने सुटकेचा निश्वास सोडलायं.

ठळक मुद्देद्रमुकची बदनामी करण्यासाठी 2 जी घोटाळयाचे कुंभाड रचण्यात आले अशी प्रतिक्रिया द्रमुकचे नेते स्टालिन यांनी निकालानंतर दिली. ष्टाचाराच्या मुद्यावरुन विरोधकांशी दोन हात करण्याचा द्रमुकचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली- 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे द्रमुकने सुटकेचा निश्वास सोडलायं. या प्रकरणात ए.राजा आणि करुणानिधी यांची कन्या कणिमोळी आरोपी असल्यामुळे तामिळनाडूत द्रमुकला याची जबर किंमत चुकवावी लागली. विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले होते. पण आता न्यायालयाच्या निकालामुळे फक्त कणिमोळी आणि राजा यांना नवीन राजकीय आयुष्य मिळणार नसून राज्य आणि केंद्रामध्येही काही समीकरणे बदलू शकतात. 

द्रमुकची बदनामी करण्यासाठी 2 जी घोटाळयाचे कुभांड रचण्यात आले अशी प्रतिक्रिया द्रमुकचे नेते स्टालिन यांनी निकालानंतर दिली. या निकालामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन विरोधकांशी दोन हात करण्याचा द्रमुकचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच काँग्रेस आणि भाजपा दोघेही द्रमुकला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करु शकतात. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळयावरुन पक्ष अडचणीत असताना काँग्रेस ठामपणे द्रमुकच्या मागे उभा राहिला नव्हता. आता मात्र काँग्रेस द्रमुकशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करेल. 

पुढच्यावर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकासह आठ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा निकाल पाहून द्रमुक काँग्रेस किंवा भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकते असे राजकीय विश्लेषक ग्नानी संकरण यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चेन्नईमध्ये जाऊन करुणानिधी यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली होती. आता पर्यंत द्रमुकने कधीच भाजपाला साथ दिलेली नाही. पण देशातील बदलती राजकीय स्थिती आणि 2 जी स्पेक्ट्रमचा निकाल राजकीय अस्पृश्यता संपुष्टात आणू शकतो.             

अशी झाली सुटका                                                                          2 जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआय न्यायालयाने गुरुवारी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा आणि द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची भ्रष्टाचार आणि आर्थिक अफरातफरीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाचा हा निकाल सर्वांसाठीच धक्कादायक आहे. 

टॅग्स :2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळाcongressकाँग्रेसBJPभाजपा