शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

२९... गुन्हे... जोड...०२

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या
नागपूर : तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सावनेर शहरातील पंचशीलनगरात सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
सुरेश हरिश्चंद्र खंडाते (३५, रा. पंचशीलनगर, सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुरेशने सोमवारी रात्री त्याच्या घरी विष प्राशन केले. सदर बाब लक्षात येताच त्याला सुरुवातीला सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***
कामठीतील जुगार अड्ड्यावर धाड
कामठी : स्थानिक पोलिसांनी कामठी शहरातील सैलाबनरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात चौघांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.
रमेश शंकर धुर्वे (३८), शेख सलाम शेख बब्बू (३५) व उमेश बाबुुराव सुखदेवे (३३०) तिघेही रा. सैलाबनगर, कामठी आणि मंगल मोहनलाल सुखदेवे (२३, रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कामठी शहरातील सैलानगर येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच कामठी पोलिसांनी तिथे धाड टाकली. दरम्यान, पोलिसांना जुगार खेळला जात असल्याचे लक्षात येताच चौघांना लगेच ताब्यात घेत त्यांच्याकडून एकूण ७९० रुपये रोख व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी कामठी पोलिसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, रमेश चहारे, रवी अहीर, संजय गिते, विनोद कामळे, युवानंद कडू आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी)
***