शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

२७... गुन्हे

By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST

बिना येथे घरफोडी

बिना येथे घरफोडी
खापरखेडा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिना येथे घरफोडी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यात चोरट्यांनी एकूण २२ हजार ७५० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
बाबाराव भाऊराव ढोबळे (६१, रा. नवीन बिना) हे गुरुवारी सकाळी घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी २२ हजार ७५० रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
***
वारंगा शिवारातील ट्रान्सफॉर्मर फोडले
नागपूर : अज्ञात चोरट्यांनी महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील ६३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारंगा शिवारात रविवारी मध्यरात्री घडली.
वारंगा शिवारात महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर आहे. चोरट्यांनी ते ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील ४० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या क्वाईल आणि इतर साहित्य लंपास केले. या साहित्याची एकूण किंमत ६३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी लाईनमन अशोककुमार कांताप्रसाद गुप्ता (५२, रा. खापरी) यांच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ३७९, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा तपास सहायक फौजदार सयाम करीत आहे. (प्रतिनिधी)
***
सावनेर शहरातून बोलेरो पळविली
सावनेर : शहरातील महात्मा फुले नगरातून चोरट्यांनी बोलेरो चोरून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
हेमंत मुरलीधर अग्रवाल (२९, महात्मा फुले नगर, सावनेर) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/एन-१३६४ क्रमांकाची बोलेरा नेहमीप्रमाणे घरासमोर उभी ठेवली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. या वाहनाची किंमत तीन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मेश्राम करीत आहे. (प्रतिनिधी)
***