शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Coronavirus: इटलीहून विशेष विमानाने 263 विद्यार्थी भारतात, सर्वजण आयटीबीपीच्या छावला कॅम्पमध्ये रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 11:39 IST

आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. 

ठळक मुद्देइटलीमध्ये तर एकाच दिवसात तब्बल 800 जणांचा मृत्यू एअर इंडियाच्या विशेष विमानाने 263 भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले.देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 315वर 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. इटलीमध्ये तर एकाच दिवसात तब्बल 800 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जगात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. आज येथून एअर इंडियाच्या विशेष विमानाने 263 भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले.

एयर इंडियाचे हे विमान आज सकाळी 9:15 वाजता दिल्ली विमान तळावर पोहोचले. येथे थर्मल स्क्रीनिंग आणि इमिग्रेशननंतर या सर्व विद्यार्थांना आयटीबीपी छावला कॅम्पमध्ये क्वारेंटाइनमध्ये पाठवण्यात आले.

संपूर्ण देशात आज सकाळी सात वाजल्यापासून जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. देशात कोरोना व्हायरस संक्रमानाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. ही संख्या आता 315वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 27वर पोहोचली आहे. 

आतापर्यंत देशाबाहेरून तब्बल 1600 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे 1600 भारतीय आणि इतर काही देशांचे नागरिक मिळून जवळपास 1700 लोकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. 

रोममध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासठी एअर इंडियाने 787 ड्रिमलाइनर विमान पाठवले होते. गेल्या काही दिवसांपासून भारताने कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या चीन, जापान आणि ईरान सारख्या देशांतून शेकडो नागरिकांना भारतात आणले आहे. सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे, की 22 मार्चपासून एक आठवड्यापर्यंत कुठल्याही देशाचे विमान भारतात येऊ दिले जाणार नाही. 

सरकारने सर्व अंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याच्या एक दिवस आधी एम्सटर्डम विमानतळावर अडकलेल्या 100 भारतीय नागरिकांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. हे सर्वजण अमेरिकेहून भारतात येत होते. नवीदिल्लीत पोहोचण्यासठी केवळ दोन तास शिल्लक असतानाच यांचे विमान पुन्हा परत निघून गेले होते. एम्सटर्डम येथे अडकलेल्या भारतीयांमध्ये संजय सप्रा देखील आहेत. त्यांच्या पत्नी टीना सप्रा यांनी नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांना पत्र लिहून आपल्या पतीला आणि इतर भारतीय नागरिकांना मदत करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी एक विशेष विमान पाठवण्याचीही विनंती केली आहे.

मलेशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्याची मागणी -केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना मलेशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थांना भारतात आणण्यावर लक्ष द्यावे असे म्हटले आहे. आपल्या पत्रात विजयन यांनी येथे जवळपास 250 विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. भारताने दुसऱ्या देशांतील विमानांना यायला बंदी घातल्याने ते तेथे अडकले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थीItalyइटलीIndiaभारतdelhiदिल्लीAirportविमानतळairplaneविमान